पैशांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो का? ‘कॅट’चं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र

| Updated on: Jun 05, 2020 | 10:35 PM

पैशांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो का? असा प्रश्न कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) (Confederation of All India Traders) केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पत्रामार्फत विचारला आहे

पैशांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो का? कॅटचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र
नोटाबंदीचे 5 वर्षे: नव्या नोटा ते डिजीटल पेमेंटचा बोलबाला
Follow us on

नवी दिल्ली : पैशांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो का? असा प्रश्न कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) (Confederation of All India Traders) केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्रामार्फत विचारला आहे. “अनेक रिपोर्ट्सनुसार नोटांमार्फत संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे हा एक चिंतेचा विषय आहे”, असंदेखील कॅटने (Confederation of All India Traders) पत्रात म्हटलं आहे.

“पैशांची एक नोट अनेकांच्या हातात पडते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. केंद्र सरकारने याबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती किंवा सूचना जारी कराव्यात. नोटांमार्फत खरच कोरोनाचा संसर्ग होणार असेल तर त्यापासून वाचण्यासाठी कशाप्रकारच्या उपायोजना करता येऊ शकतात, याबाबत माहिती द्यावी”, असं कॅटने पत्रात म्हटलं आहे.

“ही माहिती फक्त व्यापाऱ्यांसाठीच महत्त्वाची नाही तर देशभरातील सर्वसामान्य नागरिकांनादेखील या गोष्टीचा फायदा होईल. याशिवाय नोटांमार्फत कोरोनाचा संसर्ग होत असेल तर तो रोखता येईल”, असंदेखील पत्रात म्हटलं आहे.

“पैशांमार्फत किंवा नोटांमार्फत संसर्गजन्य रोग पसरतो, अशी माहिती अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्समध्ये दिली गेली आहे. अज्ञात लोकांमध्ये नोटांमार्फत होणारा संसर्ग हा अत्यंत घातक आणि चिंताजनक आहे”, असं कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, देशात उद्योगधंद्यांना सुरु होण्यासाठी हळूहळू परवानगी दिली जात आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये कारखाने, दुकानं सुरु होत आहेत. मात्र, तरीही सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अजूनही कोरोनाबाबत धाकधूक आहे.

हेही वाचा :

Corona | लॉकडाऊनमुळे मुलाचं लग्न साधेपणाने, बचत झालेल्या पैशातून हवालदाराकडून सहकाऱ्यांना सॅनिटायझर वाटप

पैसे काढायला गेल्यावर कार्ड ATM मध्ये अडकलं, थेट मशिनच फोडलं, तरुणाला जेल