नवी दिल्ली: दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येऊन देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, दिवाळीनंतर देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली असून या आठवड्यात तर रुग्णसंख्येत 16 टक्क्याने घट झाल्याने रुग्णसंख्येत घट होण्याचं प्रमाण 62 टक्क्यावर आलं आहे. त्यामुळे देशात कोरोनाची लाट येण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत असून देशवासियांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. (Corona cases drop by about 16 percent in the country this week, no sign of second wave )
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली असली तरी कोरोना मृत्यूंच्या संख्येत काहीही बदल झालेला दिसत नाही. गेल्या चार आठवड्यात कोरोनामुळे 3500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत 3539 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत 8175 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोना बळींच्या संख्येत केवळ 58 टक्क्यांनी घट झाली आहे.
या आठवड्यात देशात कोरोनाचे 2,45,599 नवीन रुग्ण सापडले आहेत. गेल्या आठवड्यात 22 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान देशात कोरोनाचे 2,91,903 रुग्ण सापडले होते. या आठवड्यात गेल्या चार आठवड्यांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट व्हायला सुरुवात झाली असून देशात कोरोनाची लाट येण्याची कोणतीच शक्यता नसल्याचंही आढळून आलं आहे. राज्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
मधला एक आठवडा वगळता गेल्या 12 आठवड्यांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सक्रिया कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. पहिल्यांदाच गेल्या 139 दिवसांत कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 लाखाहून कमी झाली आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 7 December 2020 https://t.co/vMwFDvHWQK #Maharashtra #Mahafast #News
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
संबंधित बातम्या:
सीरमनेही मागितली लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी, ठरली पहिली भारतीय कंपनी
लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी नाही, दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार?
Corona | मास्क वापरा अन्यथा होणार खुल्या तरुंगात रवानगी, शिक्षाही ठरली
(Corona cases drop by about 16 percent in the country this week, no sign of second wave )