नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Corona Patients in India). देशभरात गेल्या 24 तासात 1,486 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20,471 वर पोहोचली असून आतापर्यंत 652 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 49 रुग्णांचा मृत्यू गेल्या 24 तासात झाला आहे. दरम्यान, देशभरात सध्या 15,859 कोरोनाबाधित रुगणांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे (Corona Patients in India).
1486 new cases in the last 24 hours and 49 deaths: Ministry of Health and Family Welfare https://t.co/TCC16aPcj2
— ANI (@ANI) April 22, 2020
महाराष्ट्रात दिवसभरात 150 रुग्णांना डिस्चार्ज
कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे वाढत असताना महाराष्ट्रात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात आज दिवसभरता तब्बल 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 722 वर पोहोचली आहे. आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या 722 जणांपैकी सर्वाधिक 441 पुरुष आहे, तर 281 या महिला आहेत. त्यामध्ये 31 ते 50 या वयोगटातील 318 रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल 21 ते 30 वयोगटातील 160 रुग्ण बरे झाले आहेत. तर 98 रुग्ण हे 51 ते 60 वयोगटातील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे 91 ते 100 वयोगटातील एका तरुणानेही कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली
राज्यातील 722 रुग्ण कोरोनामुक्त, बरे होऊन घरी परतणाऱ्यांमध्येही सर्वाधिक मुंबईकरhttps://t.co/nOF2zEQs6Q #CoronaInMaharashtra #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
हरियाणा राज्यात 153 रुग्णांना डिस्चार्ज
दरम्यान, हरियाणा राज्यात आतापर्यंत 260 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी 153 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली. राज्यात आतापर्यंत 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशीदेखील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
There are 260 cases of #COVID19 in Haryana out of which 153 people have recovered & three died. 511 tests have been conducted on each 10 lakh people in the State. There is no case in three districts: Chief Minister Manohar Lal Khattar pic.twitter.com/DTG7Bdyjy6
— ANI (@ANI) April 22, 2020
कर्नाटक राज्यात आज 9 नवे कोरोनाबाधित
कर्नाटक राज्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिवसभरात 9 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 427 वर पोहोचला आहे, अशी माहिती कर्नाटक सरकारकडून देण्यात आली आहे.
9 new COVID19 cases (2-Bengaluru, 5-Kalaburagi, 2-Mysuru) confirmed in the state from yesterday 5:00 PM to today 5:00 PM. The total number of positive cases in the state is now 427 including 131 discharged and 17 deaths: Government of Karnataka pic.twitter.com/f4Wy4os94k
— ANI (@ANI) April 22, 2020
संबंधित बातम्या :
राज्यातील 722 रुग्ण कोरोनामुक्त, बरे होऊन घरी परतणाऱ्यांमध्येही सर्वाधिक मुंबईकर
रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण, राज्यभरात 62 पोलिसांना कोरोना
पिंपरी चिंचवडमध्ये तरुणांना कोरोनाचा विळखा, एकूण 64 रुग्णांपैकी तरुण रुग्णांची संख्या…
डॉक्टरांवर हल्ला केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास, जामीनही नाही, मोदी सरकारचा मोठा निर्णय