औरंगाबादः राज्यातील विविध शहरांमध्ये ओमिक्रॉन (Omicron) विषाणू आढळला असून आता मराठवाड्यातही त्याचा शिरकाव झाला. या पार्श्वभूमीवर सर्वच जिल्ह्यांतील यंत्रणा अलर्ट झाली आहे. औरंगाबाद शहरातदेखील महापालिकेने (Aurangabd Municipal Corporation) गेल्या काही दिवसांपासून युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. शहरात लसीकरणासंबंधीही व्यापक मोहीम राबवली जात आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तब्बल 650 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्याचे काम वेगाने सुरु आहे. येत्या आठवडाभरात हे बेड्स उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
– लातूर आणि पुण्यात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने औरंगाबादेत जास्त खबरदारी घेतली जात आहे. मुंबई, पुण्यातून औरंगाबादेत ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
– विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विनामास्क लोकांवर दंडात्मक कारवाई आणखी कठोर करण्यात आली आहे.
– मेल्ट्रॉनच्या कोव्हिड रुग्णालयात 350 ऑक्सिजन बेड्स आहेत.
– गरवारे कंपनीने उभारलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 125 बेड्स ऑक्सिजनचे आहेत. याठिकाणी 20 किलोलीटरचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे.
– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेकडे 150 ऑक्सिजन बेड होते, आता 650 ऑक्सिजन बेड तयार केले जात आहेत.
– सिडको ए-8 येथील मनपा रुग्णालयात 50, सिडको एन 11 येथील रुग्णालयात 50 बेड्स, नेहरूनगरच्या आरोग्य केंद्रात 100, तर पदमपुरा येथील कोरोना सेंटरमध्ये 100 ऑक्सिजन बेड्स तयार केले जात आहेत.
– या सर्व ठिकाणी ऑक्सिजनची सेंट्रल लाइन टाकण्याचे काम सुरु झाले आहे.
इतर बातम्या-