नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 67 हजारांच्या (Corona Update In India) पार गेली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 4 हजार 213 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासात 4,213 नवे रुग्ण ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. आरोग्य विभागाच्या माहितीप्रमाणे 11 मे रोजीच्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 67 हजार 152 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 4 हजार 213 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर रुग्ण बरे (Corona Update In India) होण्याचा दरही 31.15 टक्क्यांवर आला आहे.
कोरोनाची लक्षणं दिसताच हॉस्पिटलध्ये येण्याचं आवाहन पुन्हा एकदा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. त्यासाठी पत्रकार परिषदेत अमिताभ बच्चन यांची क्लीपही दाखवण्यात आली.
“आम्ही लोकांना सांगितलं की, तुम्ही जिथे आहात तिथे थांबा. पण लोकांना आपल्या घरी जायचं आहे. हाच मानवी स्वभाव आहे. त्यामुळे आम्हाला काही निर्णय बदलावे लागले. मात्र, तरीही कोरोनाचा संसर्ग गावांपर्यंत पसरणार नाही, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे”, असं गृह मंत्रालयाचे सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव (Corona Update In India) यांनी सांगितलं.
त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये मंगळवारपासून 15 गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला असून त्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुरु झालं आहे, असंही पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं.
नियम बदलताच, डिस्चार्जची संख्याही वाढली, सौम्य लक्षण आढळल्यास टेस्ट न करताच डिस्चार्जhttps://t.co/xKFcPZCxTw@ICMRDELHI @CMOMaharashtra @mybmc #CoronaInMaharashtra #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2020
या विशेष रेल्वे नवी दिल्ली (दिबरुगड), आगरताळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव , मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू (तवी) या 15 रेल्वे स्टेशन दरम्यान धावतील. ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना गावी जाण्यास याचा फायदा होईल. मात्र, प्रवासादरम्यान सोशल डिस्टंसिंग बिघडणार नाही, याचं भान प्रवाशांनी राखलं पाहिजे, असं पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं.
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 हजारांवर
महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्यात आज (11 मे) दिवसभरात 1 हजार 230 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 401 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात आज (11 मे) दिवसभरात 587 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 4 हजार 786 रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यात दिवसभरात 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या 868 वर पोहोचली आहे.
Corona Update In India
संबंधित बातम्या :
स्पेशल रिपोर्ट : पुण्यात अँटिबॉडी टेस्ट किटची निर्मिती, भारताला मोठं यश
Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 वर, दिवसभरात 1,230 नवे रुग्ण
मजूर बस किंवा श्रमिक रेल्वेनेच मूळगावी जातील याची दक्षता घ्या, केंद्राचे राज्यांना सक्त आदेश
मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई दररोज रेल्वे, कन्फर्म तिकीट हाच पास, टीसीकडून तिकीट मिळणार नाही