Corona Update : देशभरात 2546 रुग्णांची कोरोनावर मात, गेल्या 24 तासात 1553 नवे बाधित

| Updated on: Apr 20, 2020 | 7:42 PM

देशभरातील 2546 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Corona Update India). मात्र, गेल्या 24 तासात देशात 1553 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

Corona Update : देशभरात 2546 रुग्णांची कोरोनावर मात, गेल्या 24 तासात 1553 नवे बाधित
Follow us on

नवी दिल्ली :देशभरातील 2546 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Corona Update India). देशात गेल्या 24 तासात नवे 1553 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 17,265 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे गेल्या 24 तासात 36 जणांचा मृत्यू झाला आहे”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अग्रवाल बोलत होते (Corona Update India).

“देशात साडेसात दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. याअगोदर साडेतीन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट व्हायचा. देशभरातील 59 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. गोवा राज्य कोरोनामुक्त झाला आहे. याशिवाय पुदुचेरी, कर्नाटकचे कोडागू आणि उत्तराखंडच्या पौडी गढवाल या भागांमध्ये गेल्या 28 दिवसांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही”, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.

दरम्यान, “लॉकडाऊनवर कडक नजर ठेवली जात आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ज्या राज्यांमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन होत आहे त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत”, असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी केरळ सरकारला अशा प्रकारच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती दिली.