पुणे : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीवर मोठ्या वेगाने काम सुरू आहे. यातच पुण्यातल्या कोव्हीशिल्ड (Covishield) लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील 15 केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसीच्या चाचण्या करण्यात आल्या. महत्त्वाचं म्हणजे या चाचण्या समाधानकारक असल्याची भावनाही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात आली आहे. (corona vaccine Registration of tests for the third phase of the Covishield vaccine complete results are satisfactory)
या चाचण्या केल्यानंतर दिलासादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोव्हीशिल्ड लसीचे डोस ज्या स्वयंसेवकांना देण्यात आले आहेत, त्यांच्यामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे या चाचण्या समाधानकारक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. देशातील 15 केंद्रांवर तब्बल 1600 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी होते. त्यांपैकी बहुसंख्य स्वयंसेवकांना तिसऱ्या टप्प्यातील दुसरा डोसही टोचण्यात आला आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटऑफ इंडिया (SII) आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ने 12 नोव्हेंबरला कोविशील्ड (COVISHIELD) या कोरोना लसीच्या वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या आणि अंतिम चाचण्यांची घोषणा केली. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचंही सांगण्यात आलं.
ICMR आणि सीरम अमेरिकेच्या नोवावॅक्सच्यावतीने ही लस विकसित करत आहेत. या दोन्ही संस्था कोवोवॅक्सच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि संशोधनासाठी देखील एकत्र काम करत आहेत. सीरम इन्स्टिट्यूट या चाचण्यांची प्रक्रिया राबवत आहे. कोविशील्ड वॅक्सीनच्या निर्मितीमधील क्लिनिकल ट्रायल साईटचं शुल्क आयसीएमआर भरत आहे. तर सीरम इन्स्टिट्यूट लसीचा इतर खर्च करत आहे.
तिसऱ्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये आलेल्या निष्कर्षांनुसारच आयसीएमआरच्या मदतीने सीरम कोरोना लसीचं उत्पन्न सुरु करेल. भारतात आतापर्यंत कोणत्याही लसीला मंजूरी मिळालेली नाही. मात्र, तरीही सीरम इन्स्टिट्युटने 4 कोटी लसींचं उत्पादन केलं. ‘कोविशिल्ड’ लस पुण्यातील सीरम संस्थेकडून ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या ‘एस्ट्राजेनेका’च्या (AstraZeneca) मास्टर सीडसोबत विकसित करण्यात आलंय. असं असलं तरी संबंधित 4 कोटी लसींचं उत्पन्न जागतिक पातळीवरील पुरवठ्यासाठी आहे की भारतासाठी यावर सीरमने कोणतंही व्यक्तव्य करण्यास नकार दिला.
इतर बातम्या –
Corona Vaccine | सीरम इन्स्टिट्यूटची मोठी घोषणा, कोविशील्ड लसीच्या चाचणी अंतिम टप्प्यात
कोरोनावरील लस बनवण्यासाठी 900 कोटींचं अतिरिक्त बजेट; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
(corona vaccine Registration of tests for the third phase of the Covishield vaccine complete results are satisfactory)