पुणे : राज्यात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला (Balbharti HSC 12 std Books Online) आहे. त्यामुळे येत्या वर्षात दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर बालभारतीने बारावीची पुस्तक पीडीएफद्वारे ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा 12 वीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं (Balbharti HSC 12 std Books Online) आहे. त्यामुळे बाजारात पुस्तकं कशी आणायची असा प्रश्न बालभारती प्रकाशनाला पडला आहे. त्यातच यंदाच्या वर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदलत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी लवकरात लवकर पुस्तके उपलब्ध होणे गरजेचे आहे.
बालभारतीने बारावीच्या सर्व विषयांची पुस्तक तयार केली आहेत. ही पुस्तकं छापूनही तयार आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे बालभारतीच्या अधिकृत वेबसाईटवर पीडीएफद्वारे पुस्तक उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यापासून दहावी-बारावीचे विद्यार्थी अभ्यास करण्यास सुरुवात करतात. मात्र यंदा पुस्तकचं उपलब्ध नसल्याने सर्व विद्यार्थी चिंताग्रस्त झाले होते. मात्र बालभारतीने वेबसाईटवर पीडीएफद्वारे पुस्तक उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
राज्यात काल (6 एप्रिल) कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 868 झाली आहे. 70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यात मुंबईत सर्वाधिक 526 रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात 141 जणांना कोरोनाची लागण झाली (Balbharti HSC 12 std Books Online) आहे.