वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ट्रम्प यांचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रुग्णालयाबाहेरील समर्थकांना अभिवादन करताना ट्रम्प कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ट्रम्प यांना मेरीलँडच्या वॉल्टर रीड रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक रुग्णालयाच्या बाहेर हजर होते. रविवारी ट्रम्प त्यांच्या कारमधून बाहेर आले आणि त्यांनी सगळ्यांना हात दाखवला. यावेळी आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या समर्थकांना त्यांनी धन्यवाद म्हटलं आहे. (covid infected donald trump video viral from hospital)
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ट्रम्प कारमध्ये बसले असल्याचं दिसत आहे आणि हॉस्पिटलच्या बाहेर उभ्या समर्थकांना शुभेच्छा देत आहेत. याआधीही ट्रम्प यांचा 4 मिनिटांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. “मी ठीक आहे,” असं त्यांनी या व्हिडीओतून सांगितलं होतं. खरंतर, व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोस म्हणाले होते की, त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. मेडिकल टीमने दिलेल्या माहितीनुसार, आजारावेळी ट्रम्प यांची ऑक्सिजनची पातळी दोनदा घसरली होती. पण, आता त्यांची प्रकृती ठीक असून शुक्रवारी संध्याकाळपासूनच त्यांना ताप आला नाही असं सांगण्यात आलं आहे.
BREAKING: President @realDonaldTrump greets supporters outside of Walter Reed:
— Benny (@bennyjohnson) October 4, 2020
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प हे आधीपासूनच आजारी होते. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांना शुक्रवारी सकाळपासूनच श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यांच्या ऑक्सिजनची पातळीही कमी झाली होती. यावेळी व्हाईट हाऊसमध्येच त्यांना ऑक्सिजन देण्यात आला होता. (covid infected donald trump video viral from hospital)
#UPDATES President Trump waves to supporters from a motorcade on a short drive outside his hospital shortly after he had announces “a surprise” for fans, apparently designed to personally take back the narrative on his health https://t.co/dJdyigF8OQ pic.twitter.com/QTr5lcmgH9
— AFP news agency (@AFP) October 5, 2020
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांना फुफ्फुसांच्या आजारानं ग्रासलं आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी दोन वेळा त्यांनी ऑक्सिजन देण्यात आलं होतं. इतकंच नाही तर ट्रम्प यांना डेक्सामेथासोनचा डोसही देण्यात आला आहे. डेक्सामेथासोन हे ऑक्सिजनच्या कमतरता असलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी प्रभावी मानलं जातं.
इतर बातम्या –
आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल
नाना पटोलेंनी स्वीकारली सानिकाच्या शिक्षणाची जबाबदारी, वडिलांच्या आत्महत्येनंतरही दहावीत मिळवले यश
(covid infected donald trump video viral from hospital)