नवी दिल्ली : भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दहा लाखांच्या पार गेला आहे. शुक्रवारी (17 जुलै) सकाळी 9 वाजेपर्यंतच्या 24 तासात तब्बल 34 हजार 956 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. ही एका दिवसातील सर्वाधिक विक्रमी वाढ आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसरा आहे, मात्र भारतातील दर दशलक्ष लोकसंख्येमागील रुग्णांची आकडेवारी पाहिली, तर 106 व्या क्रमांकावर आहे. (COVID19 cases cross the 10 lakh mark in India)
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 लाख 03 हजार 832 वर गेला. कालच्या दिवसात 24 तासातील सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा नवा उच्चांक नोंदवला गेला. देशात तब्बल 34 हजार 956 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. अवघ्या तीन दिवसात देशात एक लाख रुग्ण वाढले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
यापैकी 3 लाख 42 हजार 473 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 6 लाख 35 हजार 757 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या दिवसात 687 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. देशात आतापर्यंत 25 हजार 602 कोरोनाबळी गेले आहेत.
#COVID19 cases cross the 10 lakh mark in India with the highest single-day spike of 34,956 cases, and 687 deaths. Total positive cases stand at 10,03,832 including 3,42,473 active cases, 6,35,757 cured/discharged/migrated and 25,602 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/zSRgtW5iAy
— ANI (@ANI) July 17, 2020
दरम्यान, दर दहा लाख नागरिकांमागे (cases per million) भारतात 658 कोरोनाग्रस्त आहेत. ‘प्रतिमिलियन आकडेवारी’ पाहता भारत या यादीत 106 व्या क्रमांकावर आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. भारतातील दर दशलक्ष लोकसंख्येमागील कोरोनाबाधितांची संख्या युरोपियन देशांपेक्षा 4 ते 8 पटीने कमी आहेत, असेही सांगितले जात आहे.
India ranks 106th with 658 cases per million.
Cases per million population in India are 4 to 8 times less than European countries.#COVID19 cases per million in Russia & US are 8 and 16 times respectively the corresponding figure in India. pic.twitter.com/ZtJTdI6zLN
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 17, 2020
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 39 लाख 49 हजार 386 वर गेली आहे. तर जगभर 5 लाख 92 हजार 690 कोरोना रुग्णांनी प्राण गमावले. 82 लाख 78 हजार 974 जण कोरोनामुक्त झाले, ही जमेची बाजू.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत अमेरिका अव्वल स्थानी कायम असून तिथे 36 लाख 95 हजार 25 रुग्ण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावरील ब्राझीलमध्ये 20 लाख 14 हजार 738 रुग्ण आहेत. भारत तिसऱ्या स्थानी असून रशिया, पेरु, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, चिले, स्पेन, युके हे दहा देश अनुक्रमे आहेत. उगमस्थान चीन पहिल्यावरुन 25 व्या स्थानापर्यंत मागे गेला आहे.
स्रोत : https://www.worldometers.info/coronavirus/
(COVID19 cases cross the 10 lakh mark in India)