मुंबई : संचारबंदीच्या उल्लंघन प्रकरणी राज्यभरात आतापर्यंत एक लाख पाच हजार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर 20 हजार नागरिकांना अटक करण्यात आली आहे. देशव्यापी लॉकडाऊनचा आज 50 वा, तर महाराष्ट्रातील संचारबंदीचा 52 वा दिवस आहे. (Curfew violation cases in Maharashtra during Lockdown)
राज्यभरात कलम 188 नुसार एक लाख पाच हजार 532 गुन्हे दाखल झाले आहेत. 20 हजार 72 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 57 हजार 430 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.
राज्यभरात पोलिसांनी ‘क्वारंटाइन’चा शिक्का असलेल्या 668 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे. कालच्या दिवशी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे.
-अवैध वाहतूक करणाऱ्या 1296 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत.
-आरोपींकडून या कालावधीत चार कोटी पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
-राज्यभरात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवकांवर हल्ल्याच्या 33 घटना घडल्या आहेत.
संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. 214 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाल्याची नोंद आहे. या प्रकरणात 764 हल्लेखोर नागरिकांना अटक झाली आहे. कालच्या दिवसात 7 ठिकाणी पोलिसांवर हल्ला झाला होता. आतापर्यंत झालेल्या हल्ल्यात 83 पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड गंभीर जखमी झाले आहेत. (Curfew violation cases in Maharashtra during Lockdown)
पोलीस कोरोनाच्या विळख्यात
महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण 925 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ‘कोरोना’ची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 100 अधिकारी आणि 825 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाची लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 84 अधिकारी आणि 709 कर्मचारी अशा एकूण 793 पोलिसांना लक्षणं दिसून येत आहेत. तर 16 अधिकारी आणि 108 पोलीस कर्मचारी असे एकूण 124 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राची 20 सुरक्षा पथकं पाठवा, राज्याची केंद्राकडे मागणीhttps://t.co/CLM6i8TcRH @AnilDeshmukhNCP @Ksbsunil
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2020
(Curfew violation cases in Maharashtra during Lockdown)