चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची शिक्षा!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली : चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली. पोक्सो (The Protection of Children from Sexual Offences) कायद्यांतर्गत ही शिक्षा देण्यात येणार आहे. पोक्सो कायद्यात यासाठीचा बदल केला जाईल. या कायद्यातील विविध कलमांमध्ये संशोधन केलं जाणार असल्याची माहिती कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर दिली. चाईल्ड पॉर्न बनवणं, […]

चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची शिक्षा!
Follow us on

नवी दिल्ली : चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली. पोक्सो (The Protection of Children from Sexual Offences) कायद्यांतर्गत ही शिक्षा देण्यात येणार आहे. पोक्सो कायद्यात यासाठीचा बदल केला जाईल. या कायद्यातील विविध कलमांमध्ये संशोधन केलं जाणार असल्याची माहिती कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर दिली.

चाईल्ड पॉर्न बनवणं, पाहणं, फॉरवर्ड करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं भारतात कायद्याने गुन्हा आहे. आता यापुढे एक पाऊल टाकत केंद्र सरकारने लहान मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यापूर्वीही 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार झाल्यास आरोपीला फाशी देण्याची तरतूद केंद्र सरकारने केली होती.

 

पोक्सो कायद्यांतर्गत बाल लैंगिक शोषण गुन्हा आहे. आतापर्यंत चाईल्ड पोर्नोग्राफी गुन्हेगारीच्या कक्षेत होती. पण याला चाप लावण्यासाठी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने थेट फाशीचा निर्णय घेतलाय. हे संशोधन संसदेत सादर करुन त्यासाठी मंजुरी मिळवून घ्यावी लागणार आहे. वाचाया कंपन्यांचं सिम वापरत असाल तर पॉर्न साईट चुकूनही पाहू नका

केंद्र सरकारने 2015 मध्ये 857 पॉर्न साईट डाऊन करण्याचे आदेश दिले होते. सायबर क्राईम रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण मोठी टीका झाल्यानंतर या निर्णयात बदल करण्यात आला. ज्या साईटवर चाईल्ड पॉर्न नाही त्यांना यात सूट देण्यात आली. वाचा व्हॉट्सअॅपवर पॉर्न व्हिडीओ शेअर केल्यास 7 वर्षांची जेल