अरविंद केजरीवालांची उद्या कोरोना चाचणी, तूर्तास स्वत: आयसोलेट

| Updated on: Jun 08, 2020 | 4:03 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना (Delhi CM Arvind Kejriwal) ताप आला असून घशात खवखवत आहे. त्यामुळे काल (7 जून) दुपारपासून त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

अरविंद केजरीवालांची उद्या कोरोना चाचणी, तूर्तास स्वत: आयसोलेट
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना (Delhi CM Arvind Kejriwal) ताप आला असून घशात खवखवत आहे. त्यामुळे काल (7 जून) दुपारपासून त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं असून त्यांची उद्या (9 जून) कोरोना चाचणी होणार आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य संजय सिंह यांनी केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली (Delhi CM Arvind Kejriwal).

अरविंद केजरीवाल यांनी काल (7 जून) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिल्ली सरकारच्या अखत्यारितील सर्व सरकारी रुग्णालयं आणि खासगी रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीच्या नागरिकांवर उपचार होतील, तर केंद्र सरकारच्या अखत्यारितील शासकीय रुग्णालयांमध्ये देशाच्या इतर भागातून आलेल्या नागरिकांवर उपचार होतील, अशी घोषणा केली होती.

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. सोमवारपासून म्हणजेच आजपासून उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांलगतच्या सीमा खुल्या केल्या जातील, अशीदेखील घोषणा त्यांनी केली होती.

दिल्ली सरकारच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णाकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान, ओळखत्र, बँक पासबूक सारखे कागदपत्रं असायला हवेत. या सर्व कागदपत्रांमधून रुग्ण दिल्लीचा नागरिक आहे हे सिद्ध होणं जरुरीचं आहे, तरंच त्या रुग्णाला दिल्ली सरकारच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये किंवा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतील.

दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 1320 नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 27 हजार 654 वर पोहोचली आहे. यापैकी 761 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या 219 कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

रणजी खेळाडू ‘कोरोना’विरुद्ध मैदानात, 91 क्रिकेटपटूंचे रक्तदान

तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?