वर्ध्यातील महिलेच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट, दिल्ली IIT चा विद्यार्थी अटकेत

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

वर्धा : एकविसाव्या शतकात युवकांमध्ये सोशल मीडियाची क्रेज वाढली आहे. मात्र हेच युवकांसाठी धोकादायक ठरत आहे. दिल्लीच्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वर्ध्यातील एक महिलेला तिच्याच फोटो वापरत बनावट फेसबुक प्रोफाईलवरून अश्लील संदेश पाठवत विनयभंग करण्यात आला. या घटनेची रामनगर पोलिसात तक्रार होताच पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केलीय. स्वप्नील मावलीकर असे आरोपीचा नाव आहे. वर्ध्यात राहणाऱ्या एका महिलेने […]

वर्ध्यातील महिलेच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट, दिल्ली IIT चा विद्यार्थी अटकेत
Follow us on

वर्धा : एकविसाव्या शतकात युवकांमध्ये सोशल मीडियाची क्रेज वाढली आहे. मात्र हेच युवकांसाठी धोकादायक ठरत आहे. दिल्लीच्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वर्ध्यातील एक महिलेला तिच्याच फोटो वापरत बनावट फेसबुक प्रोफाईलवरून अश्लील संदेश पाठवत विनयभंग करण्यात आला. या घटनेची रामनगर पोलिसात तक्रार होताच पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केलीय. स्वप्नील मावलीकर असे आरोपीचा नाव आहे.

वर्ध्यात राहणाऱ्या एका महिलेने  रामनगर पोलिसात एक तक्रार दाखल केली. यामध्ये तिचाच फोटो वापरात नेहा पाटील या नावाने बनावट अकाऊंट बनवले. स्वतःचा फोटो पाहून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर मात्र तिला अश्लील संदेश येण्यास सुरुवात झाली. अत्याचार करण्याच्या धमक्या येऊ लागल्यात. काही दिवसांनी अश्लील विडिओ आणि मेसेजना कंटाळून रामनगर पोलिसात तक्रार दिली. यानंतर पुन्हा दुसऱ्या एका बनावट अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. यातूनही तसेच मेसेज येत असल्याने रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक चौधरी यांनी सायबर सेलला माहिती काढण्यास सांगितले.

या प्रकरणाचा सायबर सेलच्या मदतीने तपास करत सायबर सेलने फेसबुकला इमेल करून माहिती मिळवण्यात आली. यात धक्कादायक प्रकार आयआयटी दिल्लीच्या कॅम्पसमधून एका विद्यार्थ्याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या स्वप्नील मावलीकर याला अटक करण्यात आली. प्रकरणाचा तपस करताना तब्बल पाच दिवस सायबर सेलचे कुलदीप टांकसाळे यांनी शोध घेत गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.

दिल्ली येथे तपास करतांना पोलीस चमू पोहचली तेव्हा पोलिसांना आरोपीला शोधणे आव्हानच होते. पोलिसांनी जेव्हा आयआयटीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करत चौकशी केली तेव्हा स्वप्नील मागील अनेक वर्षांपासून तो हॉस्टेल लाईफ जगत असल्याचे पुढे आले. यात त्या महिलेचा फोटो पहिला तेव्हा मात्र प्रेम झाला आणि यातून हा प्रकार घडला. या चुकीची माफी मागितली असल्याचे तपासात माहिती दिली.