मी मुख्यमंत्री असताना 25 हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी करत होते, आता तुमची वेळ; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Oct 20, 2020 | 11:56 PM

मी मुख्यमंत्री असताना उद्धवजी आपण 25 हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी करत होते. आता मुख्यमंत्री तुम्ही आहेत. आता तुमची वेळ आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी मुख्यमंत्री असताना 25 हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी करत होते, आता तुमची वेळ; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
Follow us on

परभणी : मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राची वाट न पाहता 10 हजार कोटींची मदत दिली होती पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ही मदत कमी पडत असून त्यांना 25 हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी केली होती. तर बागायतदारांच्या नुकसानीसाठी अजित पवारांनी दीड लाखाची मागणी केली होती. आता त्यांच्या हातात राज्य आहे. त्यांनी लवकरात लवकर मदत जाहीर करुन बळीराजाला आधार द्यावा, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra fadanvis Attacked Cm uddhav thackeray)

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी पाहणी दौरा केल्यानंतर लगोलग तातडीची मदत करायला पाहिजे होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सोलापूर दौऱ्यात कोणताही घाईत निर्णय घेणार नसल्याचं सांगितलं. पण आमची मागणी आहे की शेतकरी अतिशय वाईट अवस्थेतून जात आहे. त्यामुळे त्याला तातडीची मदत मिळणे गरजेचं आहे, असं फडणवीस म्हणाले.

मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राची वाट न पाहता 10 हजार कोटींची मदत दिली होती, असं सांगून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण सरकारशी दोन हात करु, असं फडणवीस म्हणाले.

जनभावना लक्षात घेऊन मदतीची घोषणा करा- बाळा नांदगावकर

दुसरीकडे मनसे नेते बाळा बांदगावकर यांनीही राज्य सरकारने शेतकऱ्याला लगोलग मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्रीजी जनभावना लक्षात घेऊन बांधावरची स्थिती बघितल्याबद्दल तुमचे आभार. आता शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

उद्धवजी, आपण मागच्यावेळी नुकसानग्रस्तांना सरसकट 25000 हेक्टरी द्यावे, अशी मागणी केली होती. तुम्ही स्वत:च केलेली मागणी तुम्ही पूर्ण करा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या, असं बाळा नांदगावकर म्हणाले. सोबतच नुकसानग्रस्तांच्या मागणीसंदर्भात उद्धव ठाकरेंच्या जुन्या व्हिडीओचा दाखला बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी नेतेमंडळी ग्राऊंडवर उतरुन, शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत आहेत. उद्या (बुधवारी) मुख्यमंत्री उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत.

(Devendra fadanvis Attacked Cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या

गावकरी पलिकडे, फडणवीस अलिकडे, पूल वाहून गेल्याने शेतकरी पोहत-पोहत फडणवीसांच्या भेटीला