बारामती: अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे, असं सांगतानाच विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना उद्धव ठाकरे सतत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करायचे. आता ईश्वराने त्यांना मदत देण्याची शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (devendra fadnavis Visiting Pune, Solapur districts)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी खास संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे शेतीचं शंभर टक्के नुकसान झालं आहे. गेल्या आठ दिवसांपासून एका गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क झालेला नाही. आठ दिवसांपासून वीजही आलेली नाही. संकट अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची ते मागणी करत होते. आता ईश्वरानेच त्यांना शेतकऱ्यांना मदत देण्याची शक्ती दिली आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, असं फडणवीस म्हणाले. (devendra fadnavis Visiting Pune, Solapur districts)
शेतकऱ्यांचा ऊस, सोयाबीन, कांदा सर्व काही नेस्तानाबूत झालं आहे. अधिकारी अजूनही आलेले नाहीत. पंचनामे झाले नाहीत. मुळात पंचनाम्याची गरजच नाही. शेतीचं शंभर टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी म्हणून आम्ही सरकारवर दबाव आणू, असं त्यांनी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांकडे अन्नधान्य आहे. पण विजेचे खांब कोसळल्याने विजेअभावी त्यांना दळण आणता येत नाही, असंही ते म्हणाले.
VIDEO | Devendra Fadanvis Baramati Visit | पवारसाहेबांना या सरकारला डिफेंड कराव लागतंय : देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis @Devendra_Office pic.twitter.com/K89reF8OKy
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
संबंधित बातम्या:
ओला दुष्काळ जाहीर करा, औरंगाबादेत शेतकरी आक्रमक! जिल्हाधिकारी कार्यालयावर फेकल्या कुजलेल्या भाज्या
सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस
(devendra fadnavis Visiting Pune, Solapur districts)