नाशिक : दिवाळीच्या सणामध्ये राज्यातील बाजार समित्या ह्या तीन दिवसांसाठी बंद असतात. (Directorate of Marketing) याबाबत पणन संचालनालयाचे तसे आदेशही आहेत. (Nashik) मात्र, नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या ह्या आजपासून (शनिवार) बंद राहणार आहेत. म्हणजे या बाजार समित्यांमध्ये व्यवहारच होणार नाहीत. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की सोमवार पासून बाजार समित्या ह्या बंद राहतील मात्र, व्यापारी संघाने अचानक शुक्रवारी रात्री हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर माल कुठे विक्री करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर राज्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लातूर आणि अकोला बाजार समित्यामधील व्यवहार हे सोमवारपासून बंद राहणार आहेत.
दिवाळी सणामुळे शेतकरी माल बाजारात आणत होते. बाजार समित्या एवढ्या लवकर बंद होतील याची अपेक्षाच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्हती मात्र, शुक्रवारी रात्री नाशिक व्यापारी महासंघाच्यावतीने एक पत्रक काढण्यात आले होते. ज्यामध्ये 29 ऑक्टोंबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत बाजार समित्यामधील व्यवहार हे बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. तर कांद्याचेही निलाव बंद राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या ह्या आजपासून बंद असल्या तरी सोयाबीनच्या दृष्टीने महत्वाची मानली जाणारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सोमवारपासून बंद राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी केवळ आजचा दिवस आहे. दिवाळी सणामुळे बाजारात उडीद आणि सोयाबीनची आवक वाढली होती. त्यानुसारच आतापर्यंत शेतकऱ्यांनी विक्रीचे नियोजन केले होते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची अडचण होणार नाही.
सोयाबीनच्या व इतर शेतीमालाच्या दृष्टीने अकोला बाजार समितीही महत्वाची आहे. मात्र, दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून केवळ पाच दिवस बाजार समिती ही बंद असते. शिवाय पणन संचालनालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत खेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही.
पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद ठेवता येणार नाहीत, अशी तंबी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या. असे असले तरी नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या ह्या बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. शिवाय सलग 10 दिवस कांद्याचेही व्यवहार ठप्प राहणार असल्याने कांदा सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. (Diwali festival closes market committees in Nashik, other market committees start dealing)
शेतकऱ्यांचा शेतीमाल आता हवाई मार्गाने बाजारपेठेत, कृषी उडान योजनेला सुरवात
उलटी गणती सुरु…! आवक घटूनही कांद्याचे दर कोसळलेच
जनावरांचे प्रजनन व्यवस्थापन केल्यास वर्षाला वासरू, काय घ्यावी काळजी पशूप्रजनन शास्त्रज्ञांचा सल्ला