थंडीमुळे हात पायांची बोटे सुजतात का? या उपायांनी मिळेल आराम

| Updated on: Nov 28, 2024 | 3:49 PM

हिवाळ्यात बऱ्याच लोकांच्या हात पायांना सूज येते आणि खाज सुटते. एवढेच नाही तर बोटांच्या जवळच्या नसांमध्ये वेदना आणि खाजेमुळे जखमा देखील होतात. काही घरगुती उपायांनी हे टाळता येऊ शकते.

थंडीमुळे हात पायांची बोटे सुजतात का? या उपायांनी मिळेल आराम
Follow us on

हिवाळ्यामध्ये थंडीमुळे बर्याच लोकांना त्यांच्या हातांना आणि पायांच्या बोटांना जास्त प्रमाणात खाज सुटते आणि सूज येते. त्यामुळे त्वचेमध्ये वेदना आणि जळजळ देखील जाणवते. पण असे का होते आणि ते टाळण्यासाठी काय उपाय आहेत हे तुम्हाला माहितीये का? जाणून घेऊ उपायांबद्दल.

हिवाळ्यात हात पायांच्या बोटावर सूज येण्याची कारणे

थंड हवामानात हात आणि पायांच्या त्वचेच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या लहान रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. त्यामुळे सूज येते आणि खाज सुटते. एवढेच नाही तर बोटांच्या जवळच्या नसांमध्ये वेदना आणि खाजेमुळे जखमा देखील होतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ही थंडीच्या काळात या समस्येचा सामना करावा लागत असेल तर जाणून घ्या काही घरगुती उपाय.

गरम पाण्याने शेका

हात पायांच्या बोटाची सूज कमी करण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून हात आणि पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवा. यामुळे जळजळ कमी होईल आणि खाज सुटणे देखील कमी होईल.

हे सुद्धा वाचा

टॉवेलने शेका

जर हात आणि पायांच्या बोटांना सूज आली असेल किंवा थंडी वाजत असेल तर टॉवेलने शेका. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि सूज कमी होईल त्यासोबतच थंडी वाजणे देखील थांबेल.

तेलाने मालिश करा

आता पायांच्या बोटांना आलेली सूज आणि खाज दूर करण्यासाठी तीळ किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे हात आणि पायांमध्ये आद्रता टिकून राहते आणि रक्ताभिसरणही वाढते.

कोरफड जेल

कोरफड मध्ये नैसर्गिक गुणधर्म आहेत जे जळजळ आणि खाज सुटण्यास प्रतिबंध करतात. ज्या भागावर सूज आहे किंवा जिथे खाज सुटली आहे त्या जागेवर कोरफड जेल लावा यामुळे लवकर आराम मिळेल.

बदाम आणि खोबरेल तेल

बदाम तेल आणि खोबरेल तेल या दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे जळजळ कमी होते. हे दोन्ही तेल मिक्स करा आणि ज्या भागावर सूज आहे त्या भागाची मालिश करा आणि तीस मिनिटे तसेच राहू द्या नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या सूज कमी होईल.

हळद आणि मध

हळदीमध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळद आणि मध एकत्र करून सुजलेल्या आणि खाज येत असलेल्या भागावर लावा. यामुळे जखमा, वेदना, खाज आणि सूज लवकर बरी होईल.