मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे (Domestic airlines start in India). मात्र, लॉकडाऊनदरम्यान आजपासून (25 मे) देशांतर्गत विमान सेवा सुरु झाली आहे.
दिल्ली विमानतळावरुन आज सकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी पुण्यासाठी पहिलं विमान रवाना झालं. तर मुंबई विमानतळावरुन सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पाटण्यासाठी पहिलं विमान रवाना झालं (Domestic airlines start in India).
Chaos witnessed at Mumbai International Airport after passengers arrived to catch the flights. #Flythenewnormal pic.twitter.com/8uUR6LZtni
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) May 25, 2020
आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशभरात विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये 26 मे तर पश्चिम बंगालमध्ये 28 मे पासून विमानसेवा सुरु केली जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढता संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फक्त 25 विमानांच्या उड्डाणाची परवानगी दिली गेली आहे. हळूहळू विमानांची संख्या वाढवली जाईल, असं महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
याअगोदर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यावर प्रतिक्रिया दिली होती. “रेड झोनमधील विमानतळ अशा परिस्थितीत सुरु करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे”, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
“ग्रीन झोनमधील प्रवाशांना रेड झोनमध्ये आणून संसर्गचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे धोका ही वाढेल”, असं देखील अनिल देशमुख म्हणाले आहेत.
देशात दोन महिन्यांनी विमानसेवा सुरु होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर अनेक सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रवाशांमध्ये दोन मीटरचं अंतर ठेवलं जाणार आहे. विमानतळावर आता टचलेस सिस्टिमला फॉलो केलं जाईल. प्रत्येक राज्यांनी याबाबत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
हेही वाचा : सलमान खानची नव्या क्षेत्रात उडी, ग्रूमिंग ब्रँड लाँच, सॅनिटायझरची निर्मिती