खरंच ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह की पॉलिटिकल स्टंट? अमेरिकेत चर्चेला उधाण

| Updated on: Oct 06, 2020 | 11:23 AM

ट्रम्प यांना ऑक्सिजन लावण्यात आलं असल्याची माहिती माध्यमांसमोर आली. पण यावर सर्व डॉक्टर गोंधळात असल्याचं दिसलं.

खरंच ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह की पॉलिटिकल स्टंट? अमेरिकेत चर्चेला उधाण
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यापासून ते सैन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. सगळ्यात आधी ट्रम्प यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली होती. त्यानंतर ट्रम्प यांना ऑक्सिजन लावण्यात आलं असल्याची माहिती माध्यमांसमोर आली. पण यावर सर्व डॉक्टर गोंधळात असल्याचं दिसलं. या सगळ्यामुळे ट्रम्प यांना खरंच कोरोनाची लागण झाली आहे की हा एक पॉलिटिकल स्टंट आहे ? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. (donald trump is corona positive or its just political stunt america viral news)

खरंतर, कोरोना झालेल्या व्यक्तिला जर आयसोलेनमध्ये ठेवलं गेलं तर त्याला कुठल्याही कुटुंबियांना भेटण्याची परवानगी नाही. अशात कोरोना पॉझिटिव्ह असलेले ट्रम्प रविवारी संध्याकाळी गाडीमध्ये वॉल्टर रीड रुग्णालयातून बाहेर आले. त्यांनी समर्थकांना शुभेच्छा देत त्यांचं धन्यवाद मानलं. त्यामुळे मेडिकल क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि अनेक राजकारण्यांनी याला पॉलिटिकल स्टंट म्हटलं आहे.

आता यावेळी ट्रम्प यांनी मास्क लावला होता खरा, पण त्यांच्यासोबत गाडीमध्ये फिरणाऱ्या त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जीवाला मात्र धोका आहे.

‘अध्यक्षांचे बेजबाबदार वर्तन’
ट्रम्प यांच्या अशा वागण्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रुग्णालयातील फिजिशियन यांनी यावर म्हटलं आहे की, “अध्यक्षपदाची एसयूव्ही केवळ बुलेटप्रूफच नाही तर रासायनिक हल्ल्यालाही विरोध करू शकते. पण कोरोना संक्रमणाचा प्रसार होण्याचा धोका आहेच. त्यामुळे हे बेजबाबदार वर्तन आहे. माझा विश्वास आहे की, सुरक्षा कर्मचार्‍यांना आपला जीव धोक्यात घालण्यास भाग पाडले जात आहे. ”

दरम्यान, टाईम्स ऑफि इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प हे स्वत: चांगल्या उपचारासाठी संस्थेवर दबाव टाकत आहेत. इतकंच नाही तर रुग्णालयात उपचार न घेता ते पुन्हा व्हाईट हाऊसवर जाण्यासाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येत आहे. पण कुठलीही महत्त्वाची काळजी न घेता आजारपणातून ठीक न होता असा आग्रह करणं म्हणजे जनतेचा जीव धोक्यात टाकल्यासारखं आहे.

इतर बातम्या – 

Alert! ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, विमानाइतका आहे आकार
…तर दलित समाज रस्त्यावर उतरेल, शिवसेनेचा इशारा

(donald trump is corona positive or its just political stunt america viral news)