छातीत दुखू लागल्याने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह ‘एम्स’मध्ये दाखल

| Updated on: May 11, 2020 | 12:37 AM

माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे (Dr Manmohan Singh admitted in AIIMS).

छातीत दुखू लागल्याने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह एम्समध्ये दाखल
Follow us on

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे (Dr Manmohan Singh admitted in AIIMS). त्यांना छातीत दुखत असल्याने रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी एम्समधील कार्डियाक न्यूरो सेंटरमध्ये भरती करण्यात आलं. डॉ. सिंह यांना अचानक श्वास घेण्यास त्रास सुरु झाला होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत.

मनमोहन सिंह यांना श्वास घेण्यात त्रासासोबतच छातीतही वेदना होत होत्या. त्यामुळे एम्समध्ये त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांचं एक पथक नेमण्यात आलं आहे. हे पथक सिंह यांच्यावर उपचार करत आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. डॉक्टरांच्या या पथकामध्ये मेडिसीन, कार्डियाक, पल्मोनरी आणि इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. मनमोहन सिंह यांची याआधी 2009 मध्ये एकदा एम्समध्येच ह्रदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यावेळी डॉक्टरांनी “रीडू सर्जरी” केली होती.


मनमोहन सिंह यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी भारताचे 13 वे पंतप्रधान म्हणून सलग दोन टर्म काम पाहिलं. 2004 ते 2014 या कालावधीत त्यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर राहून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले होते. मनमोहन सिंह यांनी यापूर्वी अर्थमंत्री पदासह भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले आहेत. ते जगभरात जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा :

देशातील प्रवासी रेल्वे 12 मे पासून सुरु होणार, रेल्वेचा मोठा निर्णय

Corona Updates: महाराष्ट्रात दिवसभरात 1276 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 22,171 वर

MLC Polls : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, काँग्रेसने 6 व्या जागेचा आग्रह सोडला

Dr Manmohan Singh admitted in AIIMS