औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) कापसाते उत्पादन हे दिवसेंदिवस घटत असले तरी खानदेशात आजही मोठ्या कापसाची लागवड केली जाते. यंदाही जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. मात्र, यंदा उत्पादन तर सोडाच पण शेतात केलेला खर्चही निघेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे. गेल्या दहा दिवसांपासून या भागात पाऊसच सुरु असल्याने कापसाच्या (Cotton) बोंडाचे नुकसान होत आहे तर वेचणीला आलेल्या कापसाच्या बोंडाचा मात्र, चिखल बनत आहे. खरीपातील कोणतेच पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडले नसल्याने आर्थिक कोंडी होत आहे.
कापसाचे बहरात येईपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. खानदेशात खरिपीतील पिकेही चांगल्या अवस्थेत होती. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून रोजच पाऊस बरसत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खरीपाच्या सुरवातीला पावसाच्या ओढीमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यामुळे अधिकचा खर्च झाला तरी या पिकातून उत्पादन मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. मात्र, ऑगस्टच्या मध्यापासून पावसाने हजेरी लावण्यास सुरु केली ती अजूनही कायम आहे. गेल्या 10 दिवसांपासून तर रोजच नियमित पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना शेतामध्येही जाणे मुश्किल होत आहे.
खरीपातील सोयाबीन, उडीद, मूग हे काढणीला आले आहे. तर कापसाची वेचणी करणेही आवश्यक आहेॉ परंतु पाऊस उघडीपच देत नसल्याने कापसाच्या बोंड्याचा अक्षर:शा चिखल होत आहे. या नुकसानीमुले एकरी दोन क्विंटलही उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार नाही असे चित्र झाले आहे. मराठवाड्यात सोयाबीन तर खानदेशात कापूस हे मुख्य पिक आहे. आता सर्वकाही डोळ्यासमोर असतानाही शेतकरी हे काही करु शकत नाहीत.
जळगाव जिल्ह्यात 5 लाख 18 हजार धुळ्यात 2 लाख 20 हजार तर नंदुरबारमध्ये 1 लाख 14 हजार हेक्टरावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यामध्ये पुर्वहंगाम कापूसही होता. ऑगस्टच्या सुरवातीला सर्वकाही सुरळीत होते. मात्र आता पावसाने सर्व हिरावून घेतल्याचे चित्र आहे.
पोषक वातावरणात दरवर्षी या भागात एकरी आठ ते दहा क्विंटल कापसाचे उत्पन्न होत असते. यंदा तर दुबार लागवड करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच्या उत्पादनाची अपेक्षाही होती अपेक्षेप्रमाणे उत्पन्नही मिळेल अशाप्रकारे पिके बहरातही होती. परंतु पावसाने अवकृपा केली आणि सर्वकाही पाण्यातच आहे अशी स्थिती झालेली आहे. पिक डोळ्यसमोर असूनही त्याची काढणी करता येत नाही.
यंदा संपूर्ण हंगामात एकदाही वेळेवर पाऊस झालेला नाही. हंगामाच्या सुरवातीला वेळेवर पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आणि पुन्हा पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले त्यामुळे खर्च वाढला पण पिक काढणीच्या प्रसंगी पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे एकदाही पाऊस वेळेत न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Due to rain, cotton also stalled in water, agricultural work, farmers lost)
केंद्रसरकारच्या महत्वदायी सौर कृषीपंप ‘कुसुम’ योजनेची राज्यातील स्थिती, योजनेला प्रारंभ
आंब्याच्या बागेतील रिकाम्या जागेत करा हळदीचे लागवड अन् मिळवा लाखोंचे उत्पन्न