पुणे: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापा मारल्याची घटना ताजी असतानाच आज ईडीने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची सुमारे दहा सात चौकशी केली. FEMA कायद्यांतर्गत ही चौकशी करण्यात आली आहे. ईडीने अचानक केलेल्या या चौकशीमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (ED interrogates broker Avinash Bhosale in mumbai)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने आज सकाळी अविनाश भोसले यांना मुंबईत बोलावून घेतले. त्यामुळे ते सकाळी 10 वाजता ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान ईडीने त्यांच्याकडील काही कागदपत्रांची छाननी सुरू केल्याचं समजतं. रात्री उशिरा ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर भोसले यांनी मीडियाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अचानक झालेल्या या चौकशीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
काल ईडीने पुण्यात काही ठिकाणी छापे मारले होते. त्यामुळे या संदर्भातच ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले आहे का? याबाबतचं वृत्त समजू शकलं नाही. ईडीनेही त्यावर खुलासा केला नाही. त्यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला होता. मात्र FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. (ED interrogates broker Avinash Bhosale in mumbai)
- अविनाश भोसले यांना ओळखणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते 80च्या दशकात रिक्षा चालवत होते.
- त्यानंतर त्यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
- आज ते कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. पुण्यात त्यांना रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाते.
बाणेरमध्ये व्हाईट हाऊस
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 27 November 2020https://t.co/C7PKshi05Z
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
संबंधित बातम्या:
(ED interrogates broker Avinash Bhosale in mumbai)