मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Ekanath Shinde) बंडाळीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची डोकेदुखी आधीच वाढली आहे. यातच आता महाविकास आघाडी सरकारला एकनाथ शिंदे गटाने आणखी एक धक्का दिलाय. आमदार एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नरहरी झिरवळ यांना 34 आमदारांच्या (MLA) स्वाक्षऱ्यांचं पत्र पाठवलं आहे. यावरुन शिंदेंसोबत तेवढे आमदार कन्फर्म असल्याचा अर्थ काढला जातोय. यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर पुन्हा मेठा पेच निर्माण झालाय. एकनाथ शिंदे यांनी 34 आमदारांचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांना पाठवून भरत गोगावले हे आमचे मुख्य प्रतोद असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, काल शिवसेनेनं सतरा आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांसमोर देऊन अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावर शिंदे गटातील आमदारांनी आक्षेप घेतला होता.
आपल्यासोबत किती आमदार आहेत. हे शिंदे यांनी सांगितलं नव्हतं. त्यांनी कोणताही दावा केला नव्हता. मात्र, शिंदे यांच्यासोबत 13 आमदार असल्याचा मीडियाचा अंदाज होता. त्यानंतर काल रात्री उशिरा शिंदे समर्थक आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आलं. सुरत येथील ला मेरेडियन हॉटेलमधून या आमदारांना विमानतळावर नेण्यात आलं. त्यासाठी बस आणली होती. त्यावेळी आमदार रांगेत उभे राहून बसमध्ये चढले. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि शिंदे यांच्यासोबत 45 आमदार असल्याचं कन्फर्म झालं. शिंदे यांनीही नंतर मीडियाशी संवाद साधातना आपल्याकडे 40 आमदार असल्याचं सांगितंल होतं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही फूट रोखण्याचं शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
एकनाथ शिंदे यांनी 34 आमदारांचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांना पाठवून भरत गोगावले हे आमचे मुख्य प्रतोद असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय.