मणिपूरः देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांचे निकाल (Elections Result live) येत्या काही तासात हाती येणार आहेत. मणिपूरमधील (Manipur Assembly) निकालांचीही उत्कंठा वाढत आहे. पहिल्या तासाभरातील मतमोजणीचे निकाल पाहता येथे भाजपने (Bhartiya Janata Party) दणदणीत आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेस काहीसा पिछाडीवर जातोय, असे दिसतंय. त्यापेक्षा अपक्ष उमेदवारांनीच 10 जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसची धाकधुक वाढली आहे. मागील वेळी जास्त जागा असूनही काँग्रेसला येथे सत्ता स्थापन करण्यात अपयश आले होते.
– भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे
– काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे.
– एनपीपी 11 जागांवर आघाडीवर आहे.
– एनपीएफ- 4 जागांवर आघाडीवर आहे.
– इतर अपक्ष उमेदवार 6 वर आघाडीवर आहेत.
मणिपूरमध्ये 2017 मध्ये पहिल्यांदाच भाजपने सत्ता स्थापन केली होती. छोट्या स्थानिक पक्षांशी युती करत भाजपने सत्ता हस्तगत केले होती. 2017 च्या निवडणुकीत काँग्रसकडे 28 तर भाजपकडे 21 जागा होत्या. मात्र अपक्षांना हाती घेत भाजपने सत्तेचा दावा ठोकला होता. त्या निवडणुकीच एनपीपी आणि नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आदी पक्षांना सोबत घेत भाजपने आघाडी घेत सत्ता काबीज केली होती. तसेच 2017 मधील निवडणुकीत एनपीएफला 4, एनपीईपीला 4, टीएमसीला 1 एक तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.
इतर बातम्या-