धाकटा भाऊ मोठ्या भावाला घट्ट पकडून बसलाय! डोळ्यांत अश्रू आणणारा व्हिडीओ

| Updated on: Sep 16, 2023 | 5:22 PM

हा व्हिडीओ बघून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. छोट्याशा मुलावर जेव्हा जबाबदारी येते तेव्हा त्यालाही मोठं व्हावं लागतं. शिक्षण घ्यायच्या वयात हा मुलगा त्याच्या लहान भावाला सांभाळतो आणि काम करतो. भावुक करणारा हा व्हिडीओ, असा प्रसंग नेहमी बघायला मिळत नाही.

धाकटा भाऊ मोठ्या भावाला घट्ट पकडून बसलाय! डोळ्यांत अश्रू आणणारा व्हिडीओ
kid pulling trolley
Follow us on

मुंबई: परिस्थिती माणसाला काय नाही करायला लावत? परिस्थिती वाईट असल्यास घरातल्या सगळ्यांवर जबाबदारी येते. ही जबाबदारी लहानांवर पण येते. लहान वयात शिक्षण घ्यायचं, खेळायचं सोडून घरातली मुलं काबाडकष्ट करतात. मोठा भाऊ किंवा बहीण असेल तर त्याला किंवा तिला वाटतं आपल्यावर जी परिस्थिती आलीये ती आपल्या भावंडांवर येऊ नये. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पण असाच आहे. यात एक मोठा भाऊ आपल्या धाकट्या भावाला पाठीवर बसवून नेतोय. हा व्हिडीओ खूप लोकांना आवडलाय.

इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल

इंटरनेटवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक मुलगा एका हातगाडीवरचं सामान ओढतोय. तो आपलं कर्तव्य बजावताना दिसतोय. या मुलाचा धाकटा भाऊ पाठीवर बसताना मोठ्या भावाला घट्ट पकडून बसलाय. हातगाडीवर सुद्धा खूप सामान आहे. जेव्हा घरातल्या मोठ्या मुलावर जबाबदारी येते तेव्हा तो कशाचाही विचार करत नाही. तो त्यालाही मिळणाऱ्या सगळ्या सुविधा सोडून घर उभं करण्यात सगळं लावतो.

आपुलकीची जाणीव

इन्स्टाग्रामवर Thefeel_2 नावाच्या हँडलने हा व्हिडीओ पोस्ट केलाय. एवढ्याशा मुलाने जबाबदारी पार पाडल्याने सगळी लोकं त्याचं कौतुक करत आहेत. काहींच्या डोळ्यात तर अश्रू आलेत. भावंडांचं प्रेम अतूट असतं. हा व्हिडीओ बघताना या दोन मुलांमध्ये वयाचं अंतर फार आहे हे दिसून येतं. पण वयाची पर्वाही न करता हा मोठा भाऊ सगळं करतोय. भावा-बहिणीच्या नात्यात भांडण ही खूप कॉमन गोष्ट आहे पण जेव्हा संकट येतं तेव्हा भाऊ बहीण एकमेकांसाठी उभे राहतात आणि तेव्हा आपुलकी वाढते. हा व्हिडीओ बघून या आपुलकीची जाणीव होतेय!