नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संपूर्ण देशात आर्थिक संकट ओढावलं आहे. यामुळे सगळे व्यापार आणि व्यवहार ठप्प झाले आहेत. कोविड-19 मुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली त्यामुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार (Employment) ठप्प झाला. पण आता हळुहळू देशाची आर्थिक (Indian Economy) परिस्थिती स्थिर होत आहे. एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय बेरोजगारी 23 टक्क्यांवर पोहोचली होती तर सप्टेंबरमध्ये ती 6 टक्क्यांपर्यंत आली आहे. यासगळ्यात कृषी मंत्रालय (Ministry of Agriculture) बेरोजगारांना नोकरी देत असल्याची एक बातमी व्हायरल होत आहे. (fake news ministry of agriculture is giving jobs in corona pandemic is fake news)
नोकरीसाठी नोंदणी करण्याआधी संपूर्ण माहिती घ्या…
एकीकडे सध्या देशात मोठ्या संख्येनं लोक रोजगाराच्या शोधात आहेत तर दुसरीकडे नोकऱ्यांचं आमिष दाखवून लोकांना लुटण्याचा धंधा सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी नोकरीचा अर्ज भरण्याआधी आणि आपली माहिती देण्याआधी संबंधित जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती घ्या. नाहीतर तुमच्यासोबतही फसवणूक होऊ शकते.
केंद्र सरकारने (Central Government) सतत यासंबंधी नागरिकांना जागरूकतेचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून किसान विकास मित्र समिति (KVMS) नावाची वेबसाइट कृषी मंत्रालय नोकरी देत असल्याचा दावा करत आहे. या साइटवर अशोक स्तंभ असणारं सीलदेखील आहे. त्यामुळे ही सरकारी वेबसाइट असल्याचं वाटतं. (fake news ministry of agriculture is giving jobs in corona pandemic is fake news)
‘भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने सुरुवात’
A website Kisan Vikas Mitra Samiti(KVMS) offering employment opportunities is claiming to be established under @AgriGoI#PIBFactCheck: This claim is #Fake. There is NO such website established under the Ministry of Agriculture and Farmers Welfare. pic.twitter.com/yFpJOo5xeh
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 26, 2020
केवीएमएस कृषी मंत्रालयाअंतर्गत काम करत नाही
केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) च्या तपासणीत ही वेबसाइट खोटी (Fake Website) असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, कृषी मंत्रालयाअंतर्गत या पद्धतीची कोणतीही वेबसाइट काम करत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी खोटी आहे.
IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा
सोशल मीडियाचा वापर वाढल्याने सायबर क्राईम आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा जाहिरातींना बळी पडत आपली खासगी माहिती शेअर करून अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कोणत्याही जाहिरातीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहणं महत्त्वाचं आहे.
(fake news ministry of agriculture is giving jobs in corona pandemic is fake news)