मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी चीनची मदत घेण्याची भाषा करणाऱ्या फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलेच फटकारले. मेहबुबा मुफ्ती असो किंवा फारुख अब्दुल्ला असोत, कोणीही चीनची मदत घेऊन भारतीय संविधानाला आव्हान देण्याची भाषा करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तेव्हा फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करुन 10 वर्षांसाठी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवा. मुळात ते अशाप्रकारचे वक्तव्य करुन बाहेर फिरुच कसे शकतात, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Sanjay Raut slams Farooq Abdullah and Mehbooba Mufti over Article 370 statement)
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास चीनची मदत घेऊ, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. काश्मीरमधील अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 ए रद्द करण्यास फारुख अब्दुल्ला यांचा विरोध होता. केंद्र सरकारने अध्यादेश काढून अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांना बराच काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वीच त्यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली होती. यानंतरही फारुख अब्दुल्ला यांनी अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 ए चे समर्थन करणे सुरुच ठेवले आहे. काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० आणि अनुच्छेद 35 ए पुन्हा लागू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले होते.
Be it Farooq Abdullah or Mehbooba Mufti, if someone talks about taking China’s help to challenge India’s constitution, then they should be arrested & sent to Andaman for 10 years. How are they roaming free?: Shivsena leader Sanjay Raut on Mehbooba Mufti’s Article 370 statement pic.twitter.com/UIatEjUslT
— ANI (@ANI) October 31, 2020
मेहबुबा मुफ्तींच्या वक्तव्यानंतर वादंग
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा दिला जात नाही तोपर्यंत मी तिरंगा हातात धरणार नाही, असे वक्तव्य ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केले होते. त्यांनी जम्मू काश्मीरचा जुना ध्वज परत देण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात जम्मू काश्मीरमध्ये त्यांना चांगलाच विरोध होताना दिसतोय. या वक्तव्याचा निषेध करत ‘पीडीपी’च्या तीन प्रमुख नेत्यांनी पक्षाचा राजीनामाही दिला होता.
संबंधित बातम्या:
चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची आशा- फारुख अब्दुल्ला
काश्मीरमधून कलम 370 हटवून काय केलं; काय परिस्थिती बदलली?; संजय राऊतांचा भाजपाला थेट सवाल
मोदी सरकारने काश्मीर विकायला काढलाय; ओमर अब्दुल्लांची खरमरीत टीका
(Sanjay Raut slams Farooq Abdullah and Mehbooba Mufti over Article 370 statement)