सातारा : वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) आणि संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) या दोघांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. (FIR against Prakash Ambedkar and Adv Gunaratna Sadavarte in Satara for criticizing Udayanraje and Sambhajiraje)
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?
मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करताना पुण्यात प्रकाश आंबेडकरांनी दोन्ही राजेंवर टीका केली होती. ‘एक राजा (उदयनराजे) तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन. दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी मराठा आरक्षण प्रकरणी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय’ असं प्रकाश आंबेडकर काल (8 ऑक्टोबर) पुण्यात म्हणाले होते. तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेताय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. ज्या माणसाला घटना माहिती नाही… आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही’ असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
गुणरत्न सदावर्ते यांचीही टीका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला होता. सदावर्तेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सकल मराठा समाज आणि करण गायकर यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्येही गुन्हा दखल करण्यात आला.
“गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलीची सनद बार कौन्सिलने काढून घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत असा माणूस जो छत्रपतींबद्दल घाणेरड्या, अतिशय वाईट भाषेत बोलतो, त्याची वकील म्हणवून घ्यायची लायकी नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने गुन्हे दाखल करुन अटक करावी” अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली होती.
छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गुणरत्न सदावर्तेंविरोधात कोल्हापुरात संताप व्यक्त करण्यात आला. उत्तरेश्वर पेठ तरुण मंडळाकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या पोस्टरला कोल्हापुरी चप्पल मारुन निषेध करण्यात आला. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले. (FIR against Prakash Ambedkar and Adv Gunaratna Sadavarte in Satara)
VIDEO : Prakash Ambedkar | एक राजा बिनडोक, प्रकाश आंबेडकरांची उदयनराजेंवर टीकाhttps://t.co/Wdo5C63Blf
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2020
संबंधित बातम्या :
संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह टीका अंगलट, गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान, गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलीची सनद रद्द करा, विनायक मेटे आक्रमक
(FIR against Prakash Ambedkar and Adv Gunaratna Sadavarte in Satara for criticizing Udayanraje and Sambhajiraje)