मुंबई : पहिल्याच भेटीत शारीरिक संबंध ठेवावे की नाही हा अनेकांसमोरचा मोठा प्रश्न असतो. यामुळे अनेकांच्या नात्यात दुरावा येतो, तर काही जण कोणतीही पर्वा न करता शारीरिक संबंध ठेवतात. पण याचं शास्त्रोक्त उत्तर संशोधकांनी शोधून काढलंय. पहिल्याच भेटीत शारीरिक संबंध ठेवावे की नाही यावर संशोधकांनी संशोधन केलंय.
एका संशोधनातून समोर आलंय, की पहिल्याच भेटीत किंवा सुरुवातीच्या काळातच तुम्ही शारीरिक संबंध ठेवल्यास नात्याची नवी सुरुवात करण्यास मदत होते. इस्रायलमधील इंटरडिसिप्लिनरी सेंटर (IDC) हर्ज्लिया आणि यूनिवर्सिटी ऑफ रोचेस्टर्स डिपार्टमेंट ऑफ क्लिनिकल अँड सोशल सायन्स इन सायकॉलॉजीच्या मनोवैज्ञानिकांनी हे संशोधन केलंय.
पार्टनरकडे आकर्षित होण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छाही महत्त्वाची ठरते. शिवाय यामुळे दोघांमध्ये अटॅचमेंट वाढते, असंही संशोधकांचं म्हणणं आहे.
या संशोधनाचे प्रमुख गुरित बिर्नबॉम यांच्या मते, दोन अनोळखी व्यक्तींमध्ये इमोशनल कनेक्शन वाढवण्यासाठी शारीरिक संबंधांची मोठी भूमिका असते. महिला आणि पुरुष दोघांसाठीही हे लागू पडतं. शारीरिक संबंधांसाठी पुरुष किंवा महिला उत्तेजित होतात, तेव्हा ते इमोशनलीही तेवढेच कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात.
हे संशोधन करताना महिला आणि पुरुषांना विविध गटांमध्ये ठेवण्यात आलं होतं. एकमेकांप्रती त्यांच्या भावनांचा अभ्यास करण्यात आला. यातून समोर आलं की शारीरिक संबंध इमोशनली आकर्षित करण्यासाठीही महत्त्वाची भूमिका निभावतात. यापूर्वीच काही संशोधनामध्ये समोर आलंय, की जे रोमँटिक प्रेम किंवा शारीरिक संबंधांचा अनुभव घेतात, त्यांचा मेंदू जास्त सक्रिय असतो.
(नोट – हे वृत्त संशोधनाच्या आधारावर आहे. टीव्ही 9 मराठी याची पुष्टी करत नाही. कोणताही उपचार घेण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या)