रायगड : जिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे (Mahad Building Collapse). या इमारतीत जवळपास 200 ते 250 रहिवासी राहत असल्याची माहिती आहे. महाड शहरातील काजळ पुरा परिसरात ही दुर्घटना घडली.
दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे 10 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या 5 मजली इमारतीत साधारण 50 फ्लॅट होते. यात 200 ते 250 लोक राहत होते. सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे. स्थानिकांनी 10-12 लोकांना बाहेर काढलं आहे.
LIVE Updates:
The collapse of a building in Raigad, Maharashtra is very tragic. Have spoken to DG @NDRFHQ to provide all possible assistance, teams are on the way and will be assisting with the rescue operations as soon as possible. Praying for everyone’s safety.
— Amit Shah (@AmitShah) August 24, 2020
LIVETV – रायगडमधील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, जवळपास 200 लोक अडकल्याची भीती, बचाव कार्याला सुरुवात https://t.co/ImprYhMJl7 #Mahad pic.twitter.com/jJYzgWrvm4
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 24, 2020
200 ते 250 रहिवासी अडकल्याची भीती
महाड शहरात काजळपुरा परिसरात पाच मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या मलब्याखाली जवळपास 200 ते 250 रहिवासी अडकल्याची भीती आहे. जेसीबीच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरु आहे. बचाव पथक आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहचत आहे. आतापर्यंत 8 ते 10 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. ही घटना अत्यंत भयावह आहे. या इमारतीत जवळपास 47 ते 50 फ्लॅट्स आहेत. त्यामुळे 200 ते 250 नागरिक अडल्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार माणिकराव जगताप यांनी दिली.
इमारत कोसळल्यामुळे मोठा ढिग निर्माण झाला आहे. हा ढिग बाजूला करुन नागरिकांना वाचवण्यात अनेक अडचणी येत आहेत. स्थानिकांनी तातडीने जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे. हा ढिगारा उपसायला जवळपास दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंरच खरी परिस्थिती कळेल. दरम्यान, इमारतीतील एकाही व्यक्तीसोबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
आज संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास ही इमारत कोसळली. या इमारतीचं नाव ‘तारिख गार्डन’ असं होतं. या इमारतीचं बांधकाम निकृष्ठ दर्जाचं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. सध्या पोलीस, अग्नीशमन दलाचे जवान आणि बचाव पथक यांच्याकडून ढिगारा उपसायचे काम सुरु आहे. लाईटचीदेखील व्यवस्था करण्यात येत आहे, जेणेकरुन रात्रीच्या वेळी देखील ढिगारा उपसायचे काम सुरु राहिल.
नेमकं काय घडलं?
महाड परिसरात काजळ परिसरात ही इमारत होती. तारीक गार्डन असं या इमारतीच नावं आहे. महाड शहरातील ही 5 मजली इमारत संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास कोसळली. ही सुमारे 10 वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीत जवळपास 50 कुटुंब आहेत. यापैकी 200 लोक ढिकाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती, शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.
आतापर्यंत दहा बारा लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. जे लोक जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ढिगारा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता
तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. इमारतीचा राडारोडा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी हा ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे. आता एनडीआरएफचं पथकही घटनास्थळी दाखल होत आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत मुसळधार पावसाने इमारतीचे 2 मजले कोसळले, घरांतील माणसं धावतपळत बाहेर
नाशिकमधील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर, 1 हजार 32 जुन्या वाड्यांना नोटीस
Bhanushali Building collapse | दुर्लक्ष नाही, पण लोकांना घरातून खेचून बाहेर काढू शकत नाही : महापौर
संबंधित व्हिडीओ :