कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 5 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर

| Updated on: Apr 03, 2020 | 7:54 AM

कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 19 वर पोहचला आहे (Corona in Kalyan-Dombivali).

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 5 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर
Follow us on

ठाणे : जगभरात थैमान घालणारा कोरोना महाराष्ट्रात फोफावत चालला आहे (Corona in Kalyan-Dombivali). कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी (2 एप्रिल) 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर पोहचला आहे. या 5 मधील 4 रुग्ण हे डोंबिवली पूर्वेतील आणि 1 रुग्ण कल्याण पूर्वेतील आहे (Corona in Kalyan-Dombivali).

आतापर्यंत कल्याणमध्ये 7 रुग्ण तर डोंबिवलीत 12 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेने सर्वेक्षण सुरु केले असून जंतुनाशक फवारणी सुरु केली आहे. डोंबिवलीत रुग्णाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण डोंबिवली शहर सील करण्यात आलं असून वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काल 5 नवे कोरोनाबाधित रुग्‍ण आढळून आले. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्‍णसंख्‍या आता 19 झाली आहे. नवीन रुग्‍णांपैकी 4 रुग्‍ण हे डोंबिवली पुर्व भागातील असून 1 रूग्‍ण कल्‍याण पुर्व परिसरातील आहे. डोंबिवली येथील 3 रुग्‍ण हे लग्‍न सोहळयाशी संबधीत आहे. तर 1 रुग्‍ण कोरोनाबाधित रुग्‍णांच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत शाही लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे हे लग्न जमावबंदीचे नियम मोडून करण्यात आलं. या लग्नात विदेशातून आलेला एक तरुणही उपस्थित होता. तो कोरोनाबाधित होता. या तरुणाने लग्नाच्या हळदिच्या कार्यक्रमालाही उपस्थिती लावली होती. त्यामुळे त्याच्या संपर्कात आल्याने इतरांनादेखील कोरोनाची लागण झाली.

कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीकर धास्तावले आहेत. दरम्यान, 19 पैकी 4 जणांना डिस्चार्ज मिळाला असून 15 जणांवर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे. डिस्चार्ज मिळालेल्या चारही रुग्णांना 28 दिवस घरात थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर महापालिका क्षेत्रात एकूण 518 जणांना क्वारंटाईल करण्यात आलं आहे. काही जणांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असला तरी त्यांना घरातच राहण्याचं आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

राज्यात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 235 14 17
पुणे (शहर+ग्रामीण) 45 9 2
पिंपरी चिंचवड 15 10
सांगली 25
नागपूर 16 4
कल्याण-डोंबिवली 10
नवी मुंबई* 13 1
अहमदनगर 17 1
ठाणे* 8
वसई-विरार* 6 1
यवतमाळ 4 3
बुलडाणा 5 1
सातारा 2
पनवेल* 3
कोल्हापूर 2
उल्हासनगर * 1
गोंदिया 1
औरंगाबाद 3 1
सिंधुदुर्ग 1
नाशिक 1
पालघर 1 1
रत्नागिरी 1
जळगाव 1 1
हिंगोली 1
उस्मानाबाद 1
इतर राज्य (गुजरात) 1
एकूण 423 41 24