बीडमध्ये नदीत आला माशांचा महापूर; मासे पकडण्यासाठी लोकांची गर्दी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वाहणाऱ्या केजडी नदीला माशांचा महापूर आला आहे. नदी पात्रात प्रचंड प्रमाणात वाहून आलेले मासे पाहण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी या ठिकाणी लोकांची गर्दी केली. केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील गावालगत वाहणाऱ्या केजडी नदीच्या फरशी पुलाजवळच्या नदी पात्रात पाण्यासोबत जिवंत मासे वाहत असल्याचे दिसून आले.
बीड : राज्यात सर्वत्र पावसाने धुशान घातले असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पुर आला आहे. बीडमध्ये(Beed) मात्र, एका नदीत माशांचा(Fish) महापूर आहे. नदीत मोठ्या प्रमाणात मासे वाहून आले. नदीत मोठ्या प्रणामात मासे आल्याचे वृत्त जिल्ह्यात वाऱ्यासारखे पसरले. यानंतर नागरीकांनी नदी किनारी एकच गर्दी केली. अनेकांनी हे मासे पकडून घरी नेले. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वाहणाऱ्या केजडी नदीला माशांचा महापूर आला आहे. नदी पात्रात प्रचंड प्रमाणात वाहून आलेले मासे पाहण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी या ठिकाणी लोकांची गर्दी केली. केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील गावालगत वाहणाऱ्या केजडी नदीच्या फरशी पुलाजवळच्या नदी पात्रात पाण्यासोबत जिवंत मासे वाहत असल्याचे दिसून आले.
या नदीच्या पाण्यात जणू माशांचा महापूर आल्यासारखे चित्र निर्माण झाले. हा प्रकार पाहिल्यानंतर खवय्यांनी मासे पकडण्यासाठी पुलावर एकच गर्दी केली. अवघ्या गुडघाभर पाण्यात एवढे प्रचंड मासे आल्याने लोकांनी मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केली. लोकांनी जमतील तितके जास्तीत जास्त मासे पकडून घरी नेले. काहींनी नदीला आलेल्या माशांच्या पुराचे हे दृष्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले. मांजरा धरण जवळच असल्याने बॅकवॉटरमधून हे मासे आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.