पुणे : प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात ही घटना घडली. सोनाली भिंगारदिवे असे 23 वर्षीय दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. सोनाली बेपत्ता असल्याची गेल्या मंगळवारपासून तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली होती.
सोनालीची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोनाली पुण्यामधील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत होती.
सोनाली आणि तिचा प्रियकर कराडला डिप्लोमा शिकत असताना वर्गमित्र होते. याचवेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रियकर पुण्यात आला होता आणि गेल्या चार दिवसांपासून सोनाली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल आहे.
सोनालीच्या घरातून रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वास आल्याने शेजाऱ्यांनी घर उघडलं. त्यावेळी त्यांना सोनालीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं.