औरंगाबादः दिवाळीच्या उत्सवात (Diwali Festival) सोन्याचे दर काहीसे नियंत्रणात होते. मात्र आता दिवाळीनंतर दरांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांनी सराफा बाजारात (Aurangabad Market) मोठ्या प्रमाणात गर्दी करत शुभ मुहूर्तावर सोने खरेदीचा आनंद लुटला. आता सराफा बाजारातील गर्दी काहीशी ओसरल्याचे चित्र आहे. मात्र लग्नसराईच्या दृष्टीने दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वर्दळ औरंगाबादच्या सराफा बाजारात दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव (Gold Price) काहीसे वाढलेले दिसून आले, त्याचा परिणाम औरंगाबादमध्येही दिसून आला.
औरंगाबादच्या सराफा बाजारात आज 08 ऑक्टोबर रोजी सोमवारी 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,700 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,000 रुपये असे दिसून आले. यापूर्वी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,050 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये एवढे होते. म्हणजेच सोने आणि चांदीच्या दरात दिवाळीनंतर वाढ दिसून आली. 03 नोव्हेंबर रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,250 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये एवढे दिसून आले
सोने आणि हिणकस या शब्दाचे काय नाते आहे, हे पाहण्याआधी आपण बावन्नकशी सोने म्हणजे नेमके काय हे पाहुयात. मराठी भाषेत बावन्नकशी या विशेषणाचा अर्थ शुद्ध, खरे, अस्सल, स्वच्छ, दर्जेदार असा होतो. म्हणजेच शुद्धतेच्या कसोटीत अगदी उत्तमरित्या पास झालेला असा तो बावन्नकशी. कस किंवा कसोटी या शब्दावरून बावन्नकशी हा शब्द तयार झाला. बावन्न कस असलेले म्हणजेच बावन्न कसोट्या पार केलेले सोने म्हणजे शुद्ध सोने. पण हे शुद्ध सोने अत्यंत नाजूक असते. म्हणजे त्यापासून तयार केलेला दागिना टिकूच शकत नाही. मग दागिना तयार करण्यासाठी सोन्यात काही अंशात्मक कमी दर्जाचा धातू मिसळावा लागतो. हा कमी दर्जाचा म्हणजेच ‘हीन’ दर्जाचा धातू यालाच हिणकस असे म्हटले जाते. असे हिणकस धातू सोन्यात मिसळले नाही तर सोन्याच्या दागिन्यांना आकारच येणार नाही. या हीन धातूंमध्ये तांबे, शिसे, लोखंड आदी धातू असतात. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांना हिणकस धातूंशिवाय शोभा येतच नाही, हेही लक्षात ठेवायला हवे.
जुन्या काळी खऱ्या सोन्याला साडेपंधरी, बावन्नकशी म्हणायचे. नंतर दशमान पद्धती आल्यावर शंभर नंबरी सोनं, 100 टक्के गुण असलेलं सोनं अशी विशेषणं वापरली जाऊ लागली.
इतर बातम्या-