नवी दिल्ली : जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं समोर आलं. एमसीएक्सवर फेब्रुवारी महिन्यातलं सोनं तब्बल 4 टक्क्यांनी घसरलं म्हणजेच त्याची किंमत 2050 रुपयांनी खाली आली आहे. इतकंच नाही तर , आज 10 ग्रॅम सोन्याची (Gold rate today) किंमत 48,818 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. सोन्याच्या जागतिक किमतीत होणाऱ्या घसरणीबद्दल बोलायचं झालं तर नोव्हेंबरपासूनची एका दिवसातली ही सर्वात मोठी घसरण आहे. (gold rate today in india biggest one day fall since november )
चांदी 6100 रुपयांनी खाली आली
एमसीएक्सवर चांदीच्या भावामध्ये 8.8 टक्क्यांनी घसरण झाल्याचं सांगण्यात येत ाहे. म्हणजेच 6100 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता चांदी 63,850 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर सुमारे 4 टक्क्यांनी घसरून 1,833.83 डॉलर प्रति औंस इतके झाले. आहेत.
येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणं गरजेचं आहे. मात्र, जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.
2020 मध्ये 28 टक्के सोनं महागलं
गेल्या भारतात सोन्याचा दर 28 टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारपेठेमध्ये 2020 ला सोन्याची चमक (Gold Rate in 2020) 23 टक्क्यांनी वाढली. खरंतर, कोरोनाच्या महामारीमुळे (Corona Virus Pandemic) अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि वाढत्या महागाईचा (Inflation) सामना करण्यासाठी सोन्याची मागणी वाढली असं बोललं जातं होतं. यात गुंतवणूकदारांचाही मोठ्या प्रमाणात फायदा झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोन्याच्या किंमती चकाकण्यात 2020 हे सलग दुसरे वर्ष आहे. याआधीही 2019 मध्ये सोन्याच्या भावात दुपटीने वाढ झाली होती. (gold rate today in india biggest one day fall since november )
संबंधित बातम्या –
Gold Price Today | सोनं कितीने महागलं? जाणून घ्या तुमच्या शहरातले दर
(gold rate today in india biggest one day fall since november )