यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशातील प्रत्येकाच्या नसानसात राष्ट्रगीत भिनणार, सांस्कृतिक मंत्र्यांकडून विशेष मोहिम घोषित

| Updated on: Aug 09, 2021 | 2:13 PM

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशातील प्रत्येकाच्या नसानसात राष्ट्रगीत भिनणार आहे...कारण, अख्खा देश एकच वेळी राष्ट्रगीत म्हणाणार आहे. भारत सरकारकडून यासाठी एक विशेष पोर्टल सुरु करण्यात आलं आहे.

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशातील प्रत्येकाच्या नसानसात राष्ट्रगीत भिनणार, सांस्कृतिक मंत्र्यांकडून विशेष मोहिम घोषित
G kishan reddy
Follow us on

नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशातील प्रत्येकाच्या नसानसात राष्ट्रगीत भिनणार आहे…कारण, अख्खा देश एकच वेळी राष्ट्रगीत म्हणाणार आहे. भारत सरकारकडून यासाठी एक विशेष पोर्टल सुरु करण्यात आलं आहे. ज्या पोर्टलवर तुम्ही गायलेलं राष्ट्रगीत अपलोड करावं लागेल. त्यानंतर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर या सर्व राष्ट्रगीतांचं सामुहिक प्रसारण केलं जाईल.

स्वातंत्र्यादिनी सरकारची विशेष मोहिम

rashtragaan.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर हे गेल्यानंतर तुम्हाला राष्ट्रगीत गाण्याचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, राज्य आणि वय टाकावं लागेल. यानंतर या वेबसाईटवरच राष्ट्रगीत सुरु होईल. मोबाईलवर या राष्ट्रगीताचा व्हिडीओ शूट करुन, तो व्हिडीओ तुम्हाला अपलोड करावा लागेल.

आपण सगळे भारतीय एक आहोत

देशाच्या तिरंग्यापुढे जात, पात, धर्म काही नाही, आपण सगळे भारतीय एक आहोत, हे दाखवण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचं केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डींनी सांगितलं

गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊनमध्ये होता..अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही…मात्र, अशातही भारतीयांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात भाग घ्यावा असा सरकारचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम सुरु केला आहे. 2023 पर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. राष्ट्रगीताचा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर सरकारकडून नागरिकांना प्रमाणपत्रही दिलं जाणार असल्याची माहिती मिळतेय..

QR Code

आपलं राष्ट्रगीत शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये गायलं जातं… दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला गर्वाने छाती फुगवून आपण देशासाठी बलिदान देणाऱ्यांचं स्मरण करुन त्यांना वंदन करतो. मोठ्या अभिमानाने राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला सलामी करतो. याच पार्श्वभूमीवर यंदा सरकारच्या वतीने राष्ट्रगीताचं व्हिडिओ प्रदर्शन लाल किल्ल्यावर आयोजित केले आहे. सरकारने राष्ट्रगीताचा विशेष कार्यक्रम देशातील लोकांसमोर मांडला आहे. तशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी केलीय.

सरकारच्या मोहिमेत तुम्ही कसं सहभागी होणार, फॉलो करा या स्टेप्स….

rashtragaan.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. व्हिडीओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला 4 स्टेप फॉलो कराव्या लागली. वेबसाईटवर गेल्यावर तुम्ही तुम्हाला हवी ती भाषा निवडू शकता. त्यानं पुढे जाण्यासाठी प्रोसिड किंवा पुढे जा बटनावर क्लिक करा. नवीन पेज ओपन होईल त्यात, तुम्हाला तुमचा नाव, वयोगट, देश आणि राज्य निवडायचं आहे. यानंतर परत प्रोसिड म्हणायचं, पुढच्या पेजवर तुम्हाला राष्ट्रगीताचा पर्याय दिसेल. राष्ट्रगीत प्ले करुन राष्ट्रगीत म्हणू शकता. हा राष्ट्रगीत म्हटल्याचा व्हिडीओ तुम्हाला याच साईटवर अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला भारत सरकारकडून याबाबतचं एक प्रमाणपत्रही दिलं जाईल

(Government announces special campaign for national anthem occassion of 75th independence day)