नवी दिल्ली: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील ‘गुपकार ग्रुप’ची ‘गुपकार गँग’ अशी संभावना केली आहे. ”या गुपकार गँगला जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवा आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं या गुपकार गँगला समर्थन आहे का?”, असा सवाल अमित शहा यांनी केला आहे. (Gupkar Gang Going Global: Amit Shah)
अमित शहा यांनी लागोपाठ तीन ट्विट करून हा सवाल केला आहे. यावेळी त्यांनी गुपकार ग्रुपला देशाच्या मूडसोबत चालण्याचं आवाहन केलं आहे. देशाच्या मूडसोबत वाटचाल केली नाही तर तुमचा नायनाट केला जाईल, असा इशाराही शहा यांनी दिला आहे.
गुपकार गँग आता ग्लोबल होत आहे. परदेशी शक्तींनी जम्मू-काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करावा, असं त्यांना वाटतंय. गुपकार गँगला भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अपमान करायचा आहे. गुपकार गँगच्या या भूमिकेचं सोनिया गांधी आणि राहुल गांधी स्वागत करत आहेत का? गुपकार गँगच्या या भूमिकेवर सोनिया गांधी आणि राहुल यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
काँग्रेस आणि गुपकार गँग जम्मू-काश्मीरला दहशत आणि अशांततेच्या काळात ढकलू पाहत आहेत. आम्ही अनुच्छेद 370 हटवून दलित, महिला आणि आदिवासींना दिलेले अधिकार या लोकांना हिरावून घ्यायचे आहेत, असा दावा करतानाच म्हणूनच या लोकांना देशातील प्रत्येक राज्यात पराभवाचा सामना करावा लागत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील. भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी कोणत्याही अपवित्र ग्लोबल आघाडीला स्वीकारणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
The Gupkar Gang is going global! They want foreign forces to intervene in Jammu and Kashmir. The Gupkar Gang also insults India’s Tricolour. Do Sonia Ji and Rahul Ji support such moves of the Gupkar Gang ? They should make their stand crystal clear to the people of India.
— Amit Shah (@AmitShah) November 17, 2020
संबंधित बातम्या:
काश्मीर हा भारत-पाकचा मुद्दा, मग आता एकट्या भारताचा कसा? काँग्रेसचा सवाल, अमित शहांनी धुतलं
(Gupkar Gang Going Global: Amit Shah)