‘कसौटी जिंदगी की’च्या अनुरागला कोरोना, सहकलाकारांना कोरोना चाचणीचं आवाहन

| Updated on: Jul 12, 2020 | 11:28 PM

'कसौटी जिंदगी की' या प्रसिद्ध मालिकेत अनुराग बासूची भूमिका साकरणारा अभिनेता पार्थ समथान याला कोरोनाची लागण झाली आहे (Parth Samthaan corona positive).

कसौटी जिंदगी कीच्या अनुरागला कोरोना, सहकलाकारांना कोरोना चाचणीचं आवाहन
Follow us on

मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ या प्रसिद्ध मालिकेत अनुराग बासूची भूमिका साकरणारा अभिनेता पार्थ समथान याला कोरोनाची लागण झाली आहे (Parth Samthaan corona positive). याबाबत पार्थने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे.

“माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी विनंती करतो की, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी. सध्या मी सेल्फ क्वारंटाईन आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या संपर्कातदेखील आहे. सर्वांच्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. कृपया सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी”, असं पार्थ ट्विटरवर म्हणाला (Parth Samthaan corona positive).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन काळात मालिकांच्या चित्रिकरणासाठी परवानगी दिली. तेव्हापासून ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेचं चित्रिकरण सुरु करण्यात आलं. मात्र, पार्थचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या मालिकेचं चित्रिकरण पुन्हा बंद पडलं आहे. पार्थच्या सहकलाकारांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे.

दरम्यान, ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेची निर्माता कंपनी ‘बालाजी टेलिफिल्म्स’ने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही चाहत्यांना सांगू इच्छितो की, मालिकेत एका कलाकाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सर्व टीमच्या तब्येतीची काळजी घेणं, ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. आम्ही सरकारच्या सर्व नियमांचे पालन करत आहोत”, असं ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात, ऐश्वर्या-आराध्या यांनाही संसर्ग

दरम्यान, ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची ही प्रतिक्रिया मालिकेची निर्माती एकता कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे. सर्व नियमांचे पालन केलं जात आहे, असं एकता कपूर म्हणाली आहे.

देशांतर्गत विमानसेवा सुरु झाल्यानंतर पार्थ गेल्या महिन्यात हैदराबाद येथून मुंबईत आला होता. 27 जून रोजी पार्थने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत तीन महिन्यांनंतर पुन्हा मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात, अशी माहिती त्याने आपल्या चाहत्यांना दिली होती.