केवळ पाण्यावर माणूस किती दिवस जीवंत राहू शकतो ? जेवण सोडल्यानंतर शरीरात नेमकं काय होतं?

| Updated on: Jun 27, 2024 | 7:38 PM

हल्ली अनेक जण आपल्या मागण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. परंतू माणूस अन्नपाण्यावाचून किती दिवस राहू शकतो. यावर डॉक्टरांचे म्हणणे काय आहे ?

केवळ पाण्यावर माणूस किती दिवस जीवंत राहू शकतो ? जेवण सोडल्यानंतर शरीरात नेमकं काय होतं?
water intake
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

आपण अनेकांना उपोषण करताना पाहातो. अनेकदा उपोषण करणाऱ्यांना रुग्णालयात नेले जाते. त्यामुळे आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. केवळ पाणी किंवा तरल पदार्थ पिऊन माणूस फारकाळ तग धरु शकत नाही. शरीराची सर्व यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी आपाल्याला आहार घ्यावाच लागतो. जर एखाद्या व्यक्तीला केवळ पाणीच दिले तर ती व्यक्त जगू शकते का ? अशी व्यक्ती किती दिवस जगू शकते.? यासंदर्भातील तज्ज्ञांचे मत काय आहे ? अनेक जण राजकीय उपोषणाची घोषणा करतात ? त्यावेळी ते पाणी घेत असतात किंवा त्यांना निदान पाणी तरी प्यावे अशी विनंती त्यांच्या चाहत्यांकडून केली जाते. परंतू अन्नावाचून पाण्यावर जगता येते का ?

जेवण सोडल्यानंतर शरीरात नेमकं काय होतं ?

तुम्ही जेवण केले नाही तर प्रथम शरीरातील कार्बोहायड्रेड ही वस्तू खर्च होऊ लागते. शरीरातील चरबी नष्ट होऊ लागते. त्यामुळे शरीरात जास्त फॅट असणारे लोक जास्त काळ जगू शकतात. त्यानंतर शरीरातील प्रोटीन संपू लागते. जेव्हा तुम्ही अशा स्थितीत पोहचा जेव्हा तुमच्या शरीरातील प्रोटीन संपू लागते तेव्हा तुमच्या शरीराची अवस्था खराब होऊ लागली आहे असे समजून जा…

जेवणाशिवाय माणूस किती दिवस जगतो ?

शरीराला पाण्याची गरज असते. आपल्या देशात अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला एक हत्यार म्हणून वापरले जात असते. महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी उपोषण केले होते. एकदा ते 21 दिवस उपोषणाला बसले होते. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील अनेक दिवस उपोषणाला बसले होते. जंगलात हरविल्याने किंवा इमारतीच्या ढीगाऱ्यात अडकल्याने लोक अन्न पाण्यावाचून जीवंत वाचल्याच्या बातम्या वाचत असतो. डॉक्टरांच्या मते अन्नावाचून माणूस आठ आठवडे जगू शकतो, परंतू त्याच्या जवळ पाणी असायला हवे. तसेच तो निरोगी माणूस असायला हवा.