हैदराबाद : हैदराबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं आहे. सगळीकडे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पुराचा प्रकोप दाखवणारा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. यामध्ये अवघ्या काही वेळातच संपूर्ण घर, शहरं पाण्याखाली कसं गेलं याचा हा सीसीटीव्ही आहे. (Hyderabad flood outbreak captured in CCTV)
हैदराबादच्या फूल बाग कॉलनीमध्ये अवघ्या 2 तासांमध्ये मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. याचाही एक सीसीटीव्ही समोर आला आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे शहरांत पाणी शिरलं आहे. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेल्यानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पावसाचा असा प्रकोप आधी कधीच पाहिला नसेल, दीड मिनिटांचा हा CCTV काळजाचा ठोका चुकवेल pic.twitter.com/8D12wuA5xJ
— renuka dhaybar (@renu96dhaybar) October 21, 2020
शनिवारी मध्यरात्री पहाटे 3 ते पहाटे 5 या वेळेत चंद्रयानगुट्टा परिसरातील हाफिज बाबा नगर, उमर कॉलनी, फूल बाग, इंदिरा नगर, राजीव नगर आणि शिवाजी नगर या वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे जलमय झाल्या. बालापूर इथं तलाव तुटल्यामुळे एकाच वेळी या भागात पाणी शिरलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नंदुरबारमध्ये बस ४० फूट खोल दरीत कोसळली; चौघांचा मृत्यू, 35 प्रवासी गंभीर जखमी
हैदराबादमध्ये पावसाचं रौद्र रुप, तलाव फुटल्याने अवघ्या 2 तासांत शहर पाण्याखाली pic.twitter.com/G8HX2uQ3IG
— renuka dhaybar (@renu96dhaybar) October 21, 2020
पुराचा असा आला की अख्ख्या घरात काही तासांच पाणी शिरलं, अंगावर शहारे आणणारा CCTV pic.twitter.com/vPzGzOiWNW
— renuka dhaybar (@renu96dhaybar) October 21, 2020
तलाव फुटल्यामुळे आधी शहरांत पाणी शिरलं आणि त्यानंतर नागरिकांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलं. याचाच काळजाचा ठोका चुकवणारं फूटेज समोर आलं आहे. तुम्ही पाहू शकता घराच्या बाहेर रस्ता, पार्किंग आणि ड्रॉईंग रूमचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कशा प्रकारे शहरात पाणी शिरलं असेल. काही भागांत नागरिक पाण्यामुळे अडकले असून त्यांच्यापर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Good News: लवकरच येणार कोरोना वॅक्सिन, डिसेंबरपर्यंत मॉडर्ना लसीला मिळणार मंजुरी
(Hyderabad flood outbreak captured in CCTV)