इचलकरंजीत एका रात्रीत पाच दुकानांवर डल्ला, पैसे, दागिन्यांसह गुटखाही लंपास

| Updated on: Dec 06, 2020 | 3:56 PM

गेल्या काही दिवसांपासून गांधीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. (Ichalkaranji Theft Thieves in 5 store) 

इचलकरंजीत एका रात्रीत पाच दुकानांवर डल्ला, पैसे, दागिन्यांसह गुटखाही लंपास
Follow us on

इचलकरंजी : गेल्या काही दिवसांपासून गांधीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सरनोबतवाडीत 15 दिवसांपूर्वी काही चोरट्यांनी चार ते पाच बंगले फोडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा गांधीनगर चिंचवाड रोडवरील दुकानांना डल्ला मारला. त्यावेळी चोरट्यांनी 25 हजारांसह चांदीचे दागिने लंपास केले आहेत. (Ichalkaranji Theft Thieves in 5 store)

इचलकरंजीतील करवीर तालुक्यातील वळीवडे गावाच्या हद्दीत चोरट्यांच्या हैदोस पाहायला मिळत आहे. यावेळी चोरट्यांनी दोन किराणा माल दुकान, एक मोबाईल दुकान, दोन हार्डवेअर दुकाने आणि एका ऑईलच्या दुकानात चोरी झाली.

आज (6 डिसेंबर) पहाटे तीन ते चारच्या दरम्यान अज्ञात तीन चोरट्यांनी अशोक शेंडगे यांच्या साई समर्थ दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यानंतर त्यांच्या गल्ल्यातील पाच हजार रोख घेऊन शेजारी असणाऱ्या इंद्रा मोबाईल दुकानाचं शटर उचकटून प्रवेश केला.

यावेळी मोबाईल दुकानाच्या ड्रावरमधून दहा हजार रुपये आणि चांदीचे दागिने लंपास केलं. तिथे काही अंतरावर असणाऱ्या संजय चव्हाण यांच्या हरिप्रिया सेल्स या बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाचा दरवाजा उघडला. या दुकानातील 7 हजार रुपये लंपास केलं.

तर उमेश बजाजी यांच्या जीएसके हार्डवेअर या दुकानातून तीन हजार रुपये लंपास केले. तर अशोक चव्हाण यांच्या दत्त किराणा स्टोअर्समधून माणिकचंद, कोल्हापुरी गुटखा लंपास केला. तर महालक्ष्मी लुब्रीकेंटसमध्ये चोरट्यांच्या हाताला काहीही लागलं नाही.

दरम्यान या घटनेतील सर्व चोरट्याचे फोटो सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. गांधीनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी सरनोबतवाडीत चोरट्यांनी चार ते पाच बंगल्यांना टार्गेट करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तो तपास चालू असताना पुन्हा अशी घटना घडली. गांधीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ichalkaranji Theft Thieves in 5 store)

संबंधित बातम्या : 

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर चक्क ‘मिळून ७ जणी’!

बाप नव्हे सैतान! गुप्तांगावर मेणाचे चटके, अमानुष मारहाण, सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला अटक