Lockdown 5 नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत (Important 10 things during lockdown 5) वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली जारी करत लॉकडाऊनच्या पुढील टप्प्याची घोषणा केली. याला केंद्र सरकारने अनलॉक 1 असं नाव दिलं आहे. 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन असेल. या प्रमाणे कंटेन्मेंट झोनमधील नियम जसे आहेत तसेच राहतील. कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत (Important 10 things during lockdown 5).
हा लॉकडाऊन घोषित करताना केंद्र सरकारने या काळात पाळावयाच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे,
1. तोंड झाकणे – सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवास करताना आपलं तोंड झाकणं बंधनकारक असणार आहे.
2. शारीरिक अंतर – प्रत्येक व्यक्तीने एकमेकांपासून 6 फूट अंतर पाळणं अत्यावश्यक आहे. दुकानं आणि खरेदीच्या ठिकाणी संबंधितांनी ग्राहकांमध्ये हे अंतर पाळलं जाईल यासाठी काळजी घ्यायची आहे. तसेच एकावेळी 5 हून अधिक व्यक्ती असणार नाहीत याचीही खबरदारी घ्यायची आहे.
3. सार्वजनिक कार्यक्रम – सार्वजनिक कार्यक्रमांवर अजूनही निर्बंध कायम असणार आहेत. लग्नासाठी अधिकाधिक व्यक्तींची संख्या 50 हून कमी निश्चित करण्यात आली आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी ही संख्या 20 इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे.
4. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा मानून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
5. सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, पान-गुटखा-तंबाखू सेवन यावरही बंदी असेल.
6. वर्क फ्रॉम होम – शक्य तितक्या ठिकाणी घरुन काम करण्याचा (वर्क फ्रॉम होम) प्रयत्न करावा.
7. कामाची ठिकाणं, दुकानं, बाजार, इंडस्ट्रीअल ठिकाणं आणि व्यावसायिक केंद्र यांनी वेळीची बंधनं पाळणं आवश्यक आहे.
8. स्वच्छता आणि तपासणी – प्रवेश, बाहेर पडण्याचे मार्ग आणि एकत्र जमण्याची सामाईक ठिकाणं येथे तापमान तपासणी, हँड वॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी.
9. कामाच्या ठिकाणी दैनंदिन स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण अत्यावश्यक आहे. दरवाजाच्या हँडल आणि इतर अशी ठिकाणं जिथं अनेकांचा स्पर्श होतो त्या ठिकाणांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण शिफ्टप्रमाणे करणं गरजेचं असेल.
10. कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणच्या प्रमुखांनी शारीरिक अंतर पाळलं जाईल, दोन शिफ्टमध्ये अंतर राहिल आणि जेवणाच्या ठिकाणी देखील खबरदारी जाईल यावर बारकाईने लक्ष ठेवावं.
रात्रीचा कर्फ्यू कायम
रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आता कर्फ्यू असेल. यापूर्वी ही संचारबंदी संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत होती. शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांबद्दल निर्णय नंतर घेण्यात येईल.
कंटेनमेंट झोनबाहेर जवळपास सर्व उघडणार
कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.
पहिला टप्पा – 8 जूनपासून पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल उघडले जातील. मात्र यासाठी नियम आणि अटी लागू असतील.
दुसरा टप्पा – यामध्ये शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था उघडल्या जातील. मात्र त्याबाबत राज्य सरकार आपल्या स्तरावर निर्णय घेतील. पालकांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. जुलै महिन्यात शाळा सुरु करण्याचा विचार आहे, मात्र त्याबाबत राज्य सरकारांनीच ठरवायचं आहे. त्यामुळे शाळा सुरु होणार की नाही हे जुलैमध्येच ठरेल.
तिसरा टप्पा – तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमाने, मेट्रो रेल्वे, सिनेमा थिएटर, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार आणि ऑडिटोरियम याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.
कुठेही प्रवासासाठी परवानगीची गरज नाही
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंटेन्मेंट झोन वगळता आता कुठेही प्रवास करता येणार आहे. त्यासाठी कोणत्याही परवानगीची किंवा ई-पासची गरज नाही. मात्र राज्य सरकारने त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. जिल्ह्यांमध्ये किंवा आंतरराज्य प्रवास करु द्यायचा की नाही हे राज्यांनी ठरवायचं आहे, मात्र केंद्राने या प्रवासाला परवानगी दिली आहे.
नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार? काय बंद?
1.कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार
2. कंटेन्मेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन
3. रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदीर,मशिद धार्मिक स्थळं उघडणार
4. रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार
5. रेड झोन बाहेर 8 जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी
6. राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही
7. कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही
8. दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार
9.प्रतिबंधित क्षेत्रे राज्येच ठरवणार
10.प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू
11.शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय
12. राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार
(Lockdown 5 guidelines)
संबंधित बातम्या
Lockdown 5.0 : प्रवासासाठी परवानगीची गरज नाही, लॉकडाऊन 5 चे नियम आणि टप्पे कोणते?
LOCKDOWN 5.0 | देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, केंद्र सरकारकडून नियमावली जारी
Important 10 things during lockdown 5