40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही : एकनाथ खडसे

| Updated on: Oct 23, 2020 | 4:27 PM

'मी 40 वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करून मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही. मी काही लेचापेचा नाही.' अशा शब्दात खडसेंनी भाजवर घणाघात केला आहे.

40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही : एकनाथ खडसे
Follow us on

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसें यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘मी 40 वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करून मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही. मी काही लेचापेचा नाही.’ अशा शब्दात खडसेंनी भाजवर घणाघात केला आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की माझा किती छळ झाला, अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारलं की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा असंही म्हटलं. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपमध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला’ अशी टीका खडसे यांनी केली आहे. (In 40 years I have never done politics with a woman said by Eknath Khadse)

खडसेंच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
– आयुष्याचे ४० वर्ष भाजपमध्ये काम केलं
– ४० वर्षे ज्या ठिकाणी राहिलो त्यामुळं एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही
– विधानसभेत माझी किती बदनामी झाली, छळ केला गेला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं
– माझं काय चुकलं? या प्रश्नाचं उत्तर मला या क्षणापर्यंत मिळालं नाही.
– मंत्रिमंडळातही मला संघर्ष करावा लागला, तो माझा स्थायी स्वभाव
– उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला ६ जागा यायच्या, त्यातील ५ जागा कायम निवडून आणल्या
– समोरासमोर लढलो पण एकमेकांबद्दल द्वेष ठेवला नाही… पाठीत खंजीर कधी खुपसला नाही.
– ४० वर्षाच्या राजकारणात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केलं नाही
– मी लेचापेचा नाही…
– त्यांनी ईडी मागे लावली तर मी सीडी लावेल… खोचक टोला
– भारतीय जनता पक्षानं मला अडगळीत टाकलं, आता संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती. रोहिणीताईंना तिकीट दिलं, ते आम्ही मागितलं नव्हतं.
– नाथाभाऊनं पक्षाला सर्वस्व दिलं… त्यावर तुम्ही मला काय दिलं? खडसेंचा भाजपला सवाल
– उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करुन दाखवेन
– दिल्लीतील वरिष्टांशीही चर्चा केली… त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला पक्षात संधी नाही. तुम्ही राष्ट्रवादीत जा
– डोक्यावरचं ओझे गेल्यासारखे वाटते, हलकं हलकं वाटतं
– जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो

इतर बातम्या – 

जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्याचा प्रयत्न, पवारांसोबत तासभर चर्चा, खडसेंच्या प्रवेशासाठी कार्यकर्ते ताटकळत

‘भाजपचं नामोहरम करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरेंवर दबाव टाकू शकतात’

(In 40 years I have never done politics with a woman said by Eknath Khadse)