औरंगाबादः शहरातील किराडपुरा येथील पेट्रोल पंपावर एका 12 वर्षीय मुलाने तब्बल सव्वा लाख रुपयांची रोकड पळववल्याचे (Theft by minor boy) उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाने एवढी मोठी चोरी केल्याची घटना उघड झाल्यावर पोलिसही चक्रावून गेले. ही घटना शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमुळे ती उघडकीस (Aurangabad police) आली.
शहरातील आझाद चौकाजवळील इस्सार पेट्रोल पंपावर मुदस्सीर खान शकील खान हे व्यवस्थापक आहेत. सायंकाळी पाच नंतर पेट्रोल पंपाच्या केबिनमधील काउंटरमध्ये त्यांनी रक्कम जमा केली. त्याचदरम्यान पंपावरील कामगार शेख सलीम शमशोद्दीन यांनी विद्युत मोटर खराब झाल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे मुदस्सीर हे बिघडलेली मोटर दुरुस्तीला टाकण्यासाठी पैठण गेटला गेले. तेथून परत आल्यावर काऊंटरची तपासणी केली असता तेव्हा त्यातील रोख चोरीला गेल्याचे समोर आले.
पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात बारा वर्षीय मुलाने रोकड चोरल्याचे समोर आले. त्यावरून मुदस्सीर यांनी जिन्सी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, सहाय्यक फौजदार हेमंत सुपेकर यांनी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर बातम्या-