नवी दिल्ली : भारतात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (India Corona Update). देशात गेल्या 24 तासात 6 हजार 767 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. या नव्या रुग्णांसोबतच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 31 हजार 868 वर पोहोचला आहे (India Corona Update).
कोरोनामुळे देशात काल (23 मे) दिवसभरात तब्बल 147 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 3 हजार 867 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट वाढला आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या आता 41.28 टक्क्यांवर गेली आहे. देशात आतापर्यंत 54 हजार 441 रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर, बाधितांचा आकडा 47,190 वर
देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 हजार 190 वर पोहोचला आहे. यापैकी 1 हजार 577 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 13 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 32 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
तमिळनाडूमध्ये 15,512 रुग्ण
तमिळनाडूत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 15 हजार 512 वर पोहोचला आहे. यापैकी 7 हजार 491 रुग्ण बरे झाले आहेत. तर 103 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा 12, 910 वर
दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजारांच्या पार गेला आहे. दिल्लीत आतापर्यंत 12 हजार 910 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 6 हजार 267 रुग्ण बरे झाले आहेत. तर 231 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गुजरातमधील कोरोनाबाधितांचा आकडा 13,664 वर
गुजरातमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 13 हजार 664 वर पोहोचला आहे. यापैकी 6 हजार 169 रुग्ण बरे झाले आहेत. तर 829 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जगभरात 52 लाख कोरोनाबाधित
महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली पाठोपाठ देशातील विविध भागांमध्येही कोरोनाचा कहर सुरुच आहे. तर जगभरात 52 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिका देशात तर कोरोनाचं संक्रमण प्रचंड वाढलं आहे. अमेरिकेच आतापर्यंत 16 लाख 66 हजार 828 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 98 हजार 683 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,608 रुग्णांची भर, तर 60 जणांचा कोरोनाने मृत्यू
महाराष्ट्रातील 50 वाघ इतरत्र हलवणार, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनखात्याकडून लवकरच निर्णय