नवी दिल्ली : चीनविरोधात गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला रोखठोक इशारा देत, भारत जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं ठणकावून सांगितलं. भारताचे वीर जवान लढता लढता शहीद झाले आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान तर आहेच, पण हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं मोदी म्हणाले. (sacrifice of our jawans will not be in vain said PM Modi)
देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. त्यापूर्वी मोदींनी गलवान खोऱ्यातील संघर्षावर भाष्य करुन, शहिदांना आदरांजली वाहिली.
(sacrifice of our jawans will not be in vain said PM Modi)
मोदी म्हणाले, “जेव्हा कधी संकटं आली आहेत, तेव्हा देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपल्या क्षमतांना सिद्ध करुन दाखवलं आहे. त्याग आणि तितिक्षा आमच्या राजकीय चरित्राचा वाटा आहे. विक्रम आणि वीरतामध्ये देखील देशाच्या चरित्राचा वाटा आहे. देशाला विश्वास देऊ इच्छितो की, आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आमच्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. त्याच्या रक्षणासाठी आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही.
Delhi: PM Narendra Modi, Union Home Minister Amit Shah and the chief ministers of 15 states and union territories, who are present in the meeting via video-conferencing today, observe two-minute silence as a tribute to the soldiers who lost their lives in #GalwanValley clash. pic.twitter.com/R9smyDFwbR
— ANI (@ANI) June 17, 2020
याबाबत कुणालाही जराही भ्रम व्हायला नको. भारताला शांतता हवी आहे. पण भारताला डिवचल्यावर कोणत्याही परिस्थितीत उत्तर देण्यासाठी भारत सक्षम आहे. आमच्या दिवंगत शहीद वीर जवानांबाबत देशाला अभिमान आहे, असं मोदी म्हणाले.
गलवान आमचंच, भारताने रुळावर यावं, चीनची गुर्मी कायम
भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्यावर हल्ला करुन वर चीनची गुरगुर सुरुच असल्याचं दिसत आहे (Chinese Spokesperson on Galwan Valley). चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनी गलवान आमचंच आहे, भारतानं सैन्याला शिस्तीत ठेवावं आणि भारतानं रुळावर यावं, अशी भूमिका घेतली आहे. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतानेच चिथावल्याचा कांगावाही यावेळी चीनने केला आहे.
15 आणि 16 जूनच्या रात्री धुमश्चक्री
भारत-चीन यांच्यात झालेल्या (India-China Face Off 20 Javan Martyr) धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. मंगळवारी (16 जून) दुपारी भारतीय सेनेचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. तर, 17 जवान हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, आता हे 17 जवान देखील शहीद झाले आहेत. त्यामुळे भारत-चीन संघर्षात आतापर्यंत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, या संघर्षात चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 43 वर पोहोचली आहे.
संबंधित बातम्या
गलवान आमचंच, भारताने रुळावर यावं, चीनची गुर्मी कायम
एका- एका जवानाला तिघांनी घेरले, तरीही भारतीय वीर भिडले, गलवान खोऱ्यातील थराराची इनसाईड स्टोरी