नवी दिल्ली : ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी न उठवल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर भारताने नरमाईची भूमिका घेतली आहे. ‘कोरोना’बाधित अमेरिकेसह शेजारी देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार असल्याचं भारताने सांगितलं. (India would licence paracetamol & Hydroxychloroquine to US)
‘कोरोना’ साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या क्षमतांवर अवलंबून असणार्या सर्व शेजारी देशांना योग्य प्रमाणात पॅरासिटामॉल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विनचा परवाना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विशेषत: ‘कोरोना’चा मोठ्या प्रमाणात फटका बसलेल्या काही राष्ट्रांना आम्ही ही आवश्यक औषधे पुरवत आहोत. या संदर्भात कोणत्याही शंका-कुशंका उपस्थित करुन राजकीय रंग देणाऱ्या चर्चांना आम्ही प्रोत्साहन देत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.
‘कोरोना व्हायरस’च्या रुग्णांवरील उपचारांमध्ये वापरले जाणारे मलेरियावरील औषध ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवर भारतात बंदी आहे. अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला मान्यता दिली नसली, तरी त्याचे सकारात्मक परिणाम पाहता अमेरिकेने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची मागणी ट्रम्प यांनी भारताकडे केली होती. मोदींशी रविवारी त्यांचा फोनवरुन संवाद झाला होता. मात्र ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अवघा काही तासात भारताने बंदी उठवली आहे.
In view of the humanitarian aspects of #COVID19 pandemic, it has been decided that India would licence paracetamol & Hydroxychloroquine in appropriate quantities to all our neighbouring countries who are dependent on our capabilities: Ministry of External Affairs (MEA) pic.twitter.com/W7Vox2sd2E
— ANI (@ANI) April 7, 2020
काय आहे प्रकरण?
‘कोरोना व्हायरस टास्कफोर्स’ विषयी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये बोलत होते. ‘हायड्रोक्लोरोक्विनच्या निर्यातीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदी घातली आहे. तुम्ही काही प्रत्युत्तराचा विचार करताय का?’ असा प्रश्न यावेळी ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. (India would licence paracetamol & Hydroxychloroquine to US)
‘भारताचे अमेरिकेशी चांगले संबंध आहेत. औषध निर्यातीवरील बंदी न उचलण्यामागे आपल्याला तरी कोणतेही ठोस कारण दिसत नाही’, असं ट्रम्प म्हणाले होते. “हा त्यांचा (मोदींचा) निर्णय आहे, असं माझ्या ऐकिवात नाही. मला माहित आहे की त्यांनी इतर देशांसाठी ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मी काल त्यांच्याशी (मोदी) बोललो, खूप चांगली चर्चा झाली. एकमेकांना सहकार्य करायचे ठरले. आता ते (भारत) काय ठरवत आहेत, आपण पाहू’ असं ट्रम्प म्हणाले होते.
हेही वाचा : ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर प्रत्युत्तर देऊ, ट्रम्प यांचा भारताला इशारा
अमेरिकेसाठी ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवण्याच्या विनंतीवर आम्ही विचार करु, असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरील संभाषणात दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं.
‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा चालू ठेवला तर मी कौतुकच करेन. पण पुरवठा थांबला तर तुम्ही म्हणताय तसे प्रत्युत्तर द्यावे लागेल. आणि प्रत्युत्तर तरी का देऊ नये?’ असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला होता.
I spoke to him (PM Modi), Sunday morning & I said we appreciate it that you are allowing our supply (of Hydroxychloroquine) to come out, if he doesn’t allow it to come out, that would be okay, but of course, there may be retaliation, why wouldn’t there be?: US Pres Donald Trump pic.twitter.com/kntAqATp4J
— ANI (@ANI) April 6, 2020
‘कोरोना व्हायरस’ने जगभरात थैमान घातल्याने अमेरिकेसारख्या महासत्तेच्याही नाकी नऊ आले आहेत. अमेरिकेत कालच्या दिवशी 1200 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले होते. अमेरिकेत एकूण बळींचा आकडा 10 हजारांच्या पुढे गेला आहे. सध्या अमेरिकेत सर्वाधिक 3 लाख 66 हजार 112 कोरानाग्रस्त रुग्ण आहेत.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन काय आहे?
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळ मलेरियावरील औषध आहे. मलेरियाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या गोळया दिल्या जातात. पण सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारात हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. भारतात मोठया प्रमाणावर या औषधाची निर्मिती केली जाते. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अमेरिकेला तातडीने या औषधांची गरज आहे. मागच्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. (India would licence paracetamol & Hydroxychloroquine to US)