Pandit Jasraj | प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन

| Updated on: Aug 17, 2020 | 8:00 PM

शास्त्रीय गायनाने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांचं वयाच्या 90 वर्षी निधन झालं आहे (Pandit Jasraj passed away).

Pandit Jasraj | प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन
Follow us on

न्यूयॉर्क (अमेरिका) : शास्त्रीय गायनाने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या निधनानंतर संपूर्ण संगीत विश्व शोकसागरात बुडाले आहे (Pandit Jasraj passed away).

पंडित जसराज यांचे भारत आणि अमेरिकेसह जगभरात शिष्य आहेत. जसराज यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट, अशी भावना जगभरातील गायक आणि संगीतकारांमध्ये होती (Pandit Jasraj passed away).

पंडितजींच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. पंडितजींच्या जाण्याने भारताच्या सांस्कृतिक विश्वात पोकळी निर्माण झाल्याची भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.

पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला होता. जसराज चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांचे मोठेभाऊ पंडित मणिराम यांनी त्यांचं संगोपन केलं. जसराज हे बालपणापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी 80 पेक्षा जास्त वर्ष संगीत क्षेत्रात काम केलं.

पंडित जसराज हे भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायकांपैकी एक आहेत. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. पंडित जसराज यांचे काही शिष्य हे आज नामांकित संगीतकार आहेत. पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल यूनियनने (आयएयू) मंगळ आणि गुरु ग्रहांदरम्यान सापडलेल्या लघुग्रहाला पंडितजींचं नाव दिलं होतं.

संबंधित बातमी :

Nishikant Kamat | प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत याचे निधन