मुंबई : सणासुदीच्या दिवसात अनेक दुचाकी कंपन्या नवीन गाड्यांच्या लाँचिंगची तयारी करत आहेत. अशातच रॉयल एनफील्ड न्यू-जेन क्लासिक 350 नंतर आता नवी रेन्ज घेवून बाजारामध्ये येत आहेत. जर तुम्ही दिवाळीत बाईक घेण्याचा विचार करत असाल तर रॉयल एनफील्ड एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
रॉयल एनफील्ड बाईक्सना भारतातामध्ये खूप मागणी आहे. सध्या कंपनी भारतात नवनवीन बाईक्स लाँच करत आहे. या सर्व बाईक्सचे महत्व म्हणजे त्यांना मिळणारी रीसेल किंमत. जर तुम्ही दिवाळीत नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर रॉयल एनफील्डने तुमच्यासाठी काही पर्याय उपलब्ध केले आहेत. चला तर मग पर्यायाबद्दल माहिती करुन घेवूया.
रॉयल एनफील्ड तिच्या हिमालयन या मॉडेलवर थोडी अधिक काम करत आहे. ह्याच बाईकची यापूर्वी अनेक वेळा चाचणी करताना दिसली आहे आणि पुढील आठवड्यांत ही बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. ह्या बाईकला हिमालयीन सारखेच इंजिन आणि चेसिसचे वैशिष्ट्य देण्यात आले आहे, परंतु वेगळ्या प्रकारचे चाक देण्यात आले आहेत.
2021 हे वर्ष रॉयल एनफील्डच्या 120 व्या वर्धापन दिनाचे आहे. आणि त्याची आठवण म्हणून कंपनी चेन्नईमध्ये असणाऱ्या मोटरसायकल उत्पादक इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 मोटरसायकलसाठी काही विशेष एडिशन पेंट योजना आणण्याची शक्यता आहे. या मॉडेल्सची किंमत सध्याच्या बाईक्सपेक्षा जास्त असू शकते.
काही दिवसांपूर्वी रॉयल एनफील्डची 650 सीसी पॅरलल-ट्विन क्रूझर भारतीय रस्त्यांवर चाचणी करताना दिसली. या बाईकला शॉटगन म्हटले जाण्याची शक्यता आहे, कारण या नेमप्लेटची कंपनीच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. लॉन्च झाल्यावर रॉयल एनफील्ड क्रूझर 650 शॉटगन कावासाकी वल्कन एसला टक्कर देईल.
इतर बातम्या :
Skin Care : त्वचेच्या टोननुसार कोणते वॅक्सिंग चांगले आहे ते जाणून घ्या, वाचा अधिक!
दृष्टी गेली पण मेहनत सोडली नाही, पर्याय शोधला अन् कामाले लागले, Video पाहाच!
नाक डोळ्याचं सोडा अहो केसही सेम टू सेम, ही टिकटॉक स्टार हुबेहूब प्रिंसेस डायनाची दुसरी कॉपी!
दृष्टी गेली पण मेहनत सोडली नाही, पर्याय शोधला अन् कामाले लागले, Video पाहाच!https://t.co/3jsj2oTwan#blindman | #nashikroad | #viral | #instagram
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2021